राज्याच्या विकासात जिल्ह्याचा सहभाग वाढवू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2019 12:32 AM2019-05-03T00:32:12+5:302019-05-03T00:33:02+5:30

महाराष्ट्राच्या विकासामध्ये चंद्रपूरचा मोलाचा वाटा असला पाहिजे. जेव्हा जेव्हा राज्याला गरज पडली तेव्हा तेव्हा या जिल्ह्याने पुढे येऊन मदत केली आहे. माजी मुख्यमंत्री मा.सा. कन्नमवार यांच्यापासून राज्याच्या मदतीला धावून जाण्याचे कार्य सुरू आहे.

Increase district participation in the development of the state | राज्याच्या विकासात जिल्ह्याचा सहभाग वाढवू

राज्याच्या विकासात जिल्ह्याचा सहभाग वाढवू

Next
ठळक मुद्देसुधीर मुनगंटीवार : महाराष्ट्र दिनानिमित्त जिल्हा पोलीस मैदानावर ध्वजारोहण

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : महाराष्ट्राच्या विकासामध्ये चंद्रपूरचा मोलाचा वाटा असला पाहिजे. जेव्हा जेव्हा राज्याला गरज पडली तेव्हा तेव्हा या जिल्ह्याने पुढे येऊन मदत केली आहे. माजी मुख्यमंत्री मा.सा. कन्नमवार यांच्यापासून राज्याच्या मदतीला धावून जाण्याचे कार्य सुरू आहे. राज्याला ऊर्जा पुरविणारा हा जिल्हा असून यापुढेही राज्याच्या विकासात जिल्ह्याचा सहभाग वाढावा, अशी अपेक्षा राज्याचे वित्त, नियोजन व वनमंत्र तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली.
महाराष्ट्र राज्य स्थापनेचा ५९ वा वर्धापन दिवस चंद्रपूर येथे पोलीस मैदानावर उत्साहात पार पडला. यावेळी ते बोलत होते. सकाळी ८ वाजता पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ध्वजारोहण केले. यावेळी उपस्थिताना शुभेच्छा संदेश देताना त्यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील सिमेंट, कोळसा, कागद व वीज निर्मिती क्षेत्रात काम करणाऱ्या हजारो कामगारांना कामगार दिनाच्यादेखील शुभेच्छा दिल्या.
महाराष्ट्र दिनाच्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असणाºया ज्येष्ठ नागरिकांना, स्वातंत्र्य संग्राम सैनिकांनादेखील ना. मुनगंटीवार यांनी यावेळी अभिवादन केले. ध्वजारोहणानंतर त्यांनी यावेळी उपस्थित नागरिकांशीदेखील संवाद साधला.
अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक नवनीत कानावत यांनी पोलीस दलाच्या पथकाचे संचलन केले. महाराष्ट्र दिनी महसूल विभागातील कर्मचाऱ्यांचा त्यांच्या उत्कृष्ट कार्यासाठी सत्कार करण्यात आला. ब्रह्मपुरी तालुक्यातील तलाठी आकाश भाकरे यांना यावेळी जिल्ह्यातील आदर्श तलाठी म्हणून पुरस्कृत करण्यात आले.
ध्वजारोहणाच्या मुख्य समारंभाला आमदार नाना श्यामकुळे, जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे, महापौर अंजली घोटेकर, जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमणार जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले, स्थानिक स्वराज्य संस्थांचे पदाधिकारी यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे संचालन मोटूसिंग व मंगला आसूटकर यांनी केले.
तत्पूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जिल्हाधिकारी डॉ .कुणाल खेमनार यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Web Title: Increase district participation in the development of the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.