वाढीव दुध उत्पादनातून शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्नात वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2021 04:24 AM2021-04-05T04:24:59+5:302021-04-05T04:24:59+5:30

चंद्रपूर : सानेन जातीच्या शेळ्यांचे नेदरलँड, न्युझिलंड, इजराईल आदी देशामध्ये संगोपन केले जात असून ही शेळी दिवसाला १२ ...

Increase in economic income of farmers through increased milk production | वाढीव दुध उत्पादनातून शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्नात वाढ

वाढीव दुध उत्पादनातून शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्नात वाढ

Next

चंद्रपूर : सानेन जातीच्या शेळ्यांचे नेदरलँड, न्युझिलंड, इजराईल आदी देशामध्ये संगोपन केले जात असून ही शेळी दिवसाला १२ लिटरपर्यंत दुध देते. या शेळीच्या दुधाला विविध दुध उत्पादने तयार करण्याकरिता मोठी मागणी असून त्यास चांगला भाव मिळत असल्याने सानेन जातीच्या शेळ्या व कृत्रीम रेतनाकरिता त्याच्या विर्यमात्रा महाराष्ट्रात आयात करण्याची शासनाची योजना अंमलात आणून दुध उत्पादनातून शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्नात वाढ करण्यावर भर देण्यात, येईल असे राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास, क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनिल केदार यांनी सांगितले.

जिल्ह्यातील दुग्धव्यवसाय विकास व पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत मंत्री सुनिल केदार यांनी नियोजन भवन येथे आढावा बैठक घेतली. याप्रसंगी ते बोलत होते.

यावेळी आमदार सुभाष धोटे, आमदार किशोर जोरगेवार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्याम वाखर्डे, प्रादेशिक पशुसंवर्धन सहआयुक्त डॉ. किशोर कुंभरे, पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. भि.डो. राजपुत, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. अविनाश सोमनाथे, जिल्हा दुग्ध विकास अधिकारी गडवे तसेच जिल्ह्यातील पशुसंवर्धन व दुग्धविकास विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

चंद्रपूर जिल्ह्यातील दुध संकलन वाढविण्याकरिता जिल्ह्यातील दुध संकलन केंद्र वाढविण्याचे निर्देश मंत्री सुनिल केदार यांनी दिले. तसेच जिल्ह्यात कुक्कुट पालन व्यवसाय पुर्ण क्षमतेने होत नसल्याचे खंत व्यक्त करून कुक्कुट पालन व्यवसायाला चालना देण्यासाठी पथदर्शी कुक्कुटपालन प्रकल्प उभा करण्याकरिता जिल्हा प्रशासनाकडून किमान १० एकर जागेची मागणी करावी, असे निर्देशही त्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिले.

जिल्ह्यातील नव्याने स्थापित झालेल्या चार फिरते पशुचिकित्सालय व त्याचे फलनिष्पत्तीबाबत राज्यभरात कंत्राटी पध्दतीने पशुधन विकास अधिकारी व पशुधन पर्यवेशक ही पदे भरण्याबाबत शासनाने मान्यता प्रदान केली असून आगामी काळात रिक्त पदे भरण्याबाबतची कार्यवाही पूर्ण होणार असल्याचे त्यांनी आ. धोटे यांच्या एका प्रश्नाच्या संदर्भात सांगितले.

बैठकीत आ. सुभाष धोटे व आ. किशोर जोरगेवार यांनी जिल्ह्यातील दुध उत्पादन व पशुसंवर्धनाबाबत जिल्ह्याच्या समस्या मांडल्या. तर जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. सोमनाथे यांनी पशुसंवर्धन विभागाच्या कामाकाजाचा तपशील सादर केला.

Web Title: Increase in economic income of farmers through increased milk production

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.