विचारांची प्रगल्भता वाढवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2021 04:27 AM2021-02-13T04:27:20+5:302021-02-13T04:27:20+5:30
अनुज तारे : चांदा पब्लिक स्कूलमध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन चंद्रपूर : ध्येय गाठण्यासाठी जिद्द, चिकाटी आणि प्रयत्न करावे लागतात. या ...
अनुज तारे : चांदा पब्लिक स्कूलमध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
चंद्रपूर : ध्येय गाठण्यासाठी जिद्द, चिकाटी आणि प्रयत्न करावे लागतात. या त्रिसूत्रीचा अवलंब केल्यास जीवनात नक्कीच यश संपादन करता येते. विद्यार्थ्यांनो, अभ्यासाचा ताण घेऊ नका, त्यापेक्षा विचारांची प्रगल्भता वाढविणे आवश्यक आहे, असे मत आयपीएस अधिकारी अनुज तोरे यांनी व्यक्त केले.
लाॅकडाऊन काळात आलेली मरगळ झटकून टाकण्यासाठी चांदा पब्लिक स्कूल येथे विद्यार्थ्यांसाठी संवाद कार्यक्रम पार पडला. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी चांदा पब्लिक स्कूलच्या संचालिका स्मिता जीवतोडे, प्रार्चाय आम्रपाली पडोळे यांची उपस्थिती होती.
जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर शाळेतील विविध उपक्रमांत सहभागी होणे आवश्यक आहे. वेळेचे नियोजन, शिस्त, प्रामाणिक प्रयत्न या सर्व घटकांना आपल्या जीवनशैलीचा अविभाज्य घटक बनवा, असे आवाहन त्यांनी केले.
याप्रसंगी स्मिता जीवतोडे यांनीही मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन शिक्षिका नीलिमा पाऊणकर यांनी केले. याप्रसंगी देवांक्षी धकाते, इंद्रनील मेश्राम, अंकित वनकर, शिहाब लाखानी यांची उपस्थिती होती.