मेंडकी परिसरातील सिंचनाची व्याप्ती वाढविणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2020 06:00 AM2020-02-21T06:00:00+5:302020-02-21T06:00:33+5:30

विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाचे संचालक अविनाश सुर्वे, गोसेखुर्द प्रकल्प मंडळाचे अधीक्षक अभियंता, गोसेखुर्द उजवा कालव्याचे उपकार्यकारी अभियंता, पंचायत समिती सदस्य थानेश्वर पाटील कायरकर, तालुका काँग्रेस अध्यक्ष खेमराज तिडके, प्रभाकर सेलोकर व अधिकारी उपस्थित होते. पालकमंत्री वडेट्टीवार म्हणाले, राज्य शासनाने शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रथम प्राधान्य दिले आहे.

Increase irrigation coverage in Mendi area | मेंडकी परिसरातील सिंचनाची व्याप्ती वाढविणार

मेंडकी परिसरातील सिंचनाची व्याप्ती वाढविणार

Next
ठळक मुद्देविजय वडेट्टीवार : गोसेखुर्द सिंचन विभागातील अधिकाऱ्यांची बैठक

लोकमत न्यूज नेटवर्क
ब्रह्मपुरी : मेंडकी परिसरातील ७० टक्के शेतजमीन कोरडवाहू स्वरूपाची आहे. जवळच गोसेखुर्द उजवा कालवा असूनही शेतकऱ्यांना फायदा होत नाही. त्यामुळे २५ गावांतील हजारो हेक्टर शेती सिंचनाखाली आणणार, अशी ग्वाही राज्याचे बहुजन कल्याण, मदत व पूनर्वसन मंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली. मंगळवारी स्थानिक विश्रामगृहात पार पडलेल्या गोसेखुर्द सिंचाई विभागातील अधिकाºयांच्या बैठकीत ते बोलत होते.
यावेळी विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाचे संचालक अविनाश सुर्वे, गोसेखुर्द प्रकल्प मंडळाचे अधीक्षक अभियंता, गोसेखुर्द उजवा कालव्याचे उपकार्यकारी अभियंता, पंचायत समिती सदस्य थानेश्वर पाटील कायरकर, तालुका काँग्रेस अध्यक्ष खेमराज तिडके, प्रभाकर सेलोकर व अधिकारी उपस्थित होते. पालकमंत्री वडेट्टीवार म्हणाले, राज्य शासनाने शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रथम प्राधान्य दिले आहे. त्यामुळे गोसेखुर्द सिंचन प्रकल्पाचा सर्वाधिक शेतकऱ्यांना लाभ देणार आहोत.
यासंदर्भात जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्यासोबत दुरध्वनीवरून चर्चा करून मंत्रालयात लवकरच बैठक आयोजित करण्याचेही त्यांनी सांगितले. मेंडकी परिसरातील गावे सिंचनाखाली आणण्यासाठी शासनाकडून सर्वाधिक निधी मिळविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. प्रकल्पातील कामे पूर्ण करण्यासाठी संबंधित अधिकाºयांनी लक्ष देण्याच्या सूचनाही ना. वडेट्टीवार यांनी दिल्या.

Web Title: Increase irrigation coverage in Mendi area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.