दूध, साखरेच्या दरात वाढ; परिणामी मिठाई महागली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2021 04:32 AM2021-09-15T04:32:43+5:302021-09-15T04:32:43+5:30
बॉक्स मिठाईचे दर (२५० ग्रॅम) मलई पेढा १०० मलई बर्फी १२० काजू कतली २०० लाडू ७० ------ का ...
बॉक्स
मिठाईचे दर (२५० ग्रॅम)
मलई पेढा १००
मलई बर्फी १२०
काजू कतली २००
लाडू ७०
------
का वाढले दर?
दूध व साखरेच्या दरात वाढ झाली आहे. यासोबतच गॅस सिलिंडरच्या दरातही वाढ झाली आहे. त्यामुळे काही प्रमाणात पेढा व मिठाईच्या दरात वाढ करण्यात आली आहे.
- राकेश सूर्यवंशी, विक्रेता
-------
दिवसेंदिवस महागाई वाढत आहे. गॅस सिलिंडर तर हजाराच्या जवळपास पोहोचला आहे. आता साखर आणि दुधाच्या दरात वाढ झाली आहे. परंतु, मिठाईच्या दरात पाहिजे तशी वाढ केली नाही.
- गणेश उपाध्ये, विक्रेता
बॉक्स
भेसळीकडे लक्ष असू द्या
गणेशोत्सवात मिठाईला मोठ्या प्रमाणात मागणी असते. त्यामुळे काही स्विटमार्टचे चालक भेसळ करीत असल्याने अनेकदा कारवाईवरून समोर आले आहे. त्यामुळे मिठाई खरेदी करताना बेस्ट बिफोर बघूनच खरेदी करावे.
बॉक्स
ग्राहक म्हणतात-
दिवसेंदिवस महागाई मोठ्या प्रमाणात वाढत आहे. पूर्वीचे कोरोनाचे संंकट त्यातच वाढती महागाई यामुळे बजेट बसविणे जिकिरीचे झाले आहे. घर सांभाळताना मोठी कसरत करावी लागत आहे.
- संजना पगडपल्लीवार, गृहिणी
-------
यंदा गणपतीच्या पूजेच्या साहित्यामध्येही प्रचंड वाढ झाली आहे. तसेच मिठाईच्या दरातही वाढ झाली आहे. शासनाने महागाईवर नियंत्रण मिळविणे गरजेचे आहे. वाढत्या महागाईने सर्वसामान्यांचे मोठे हाल होत आहेत.
- सुप्रिया रापेल्लीवार, गृहिणी
-----
दरावर नियंत्रण कुणाचे?
महागाईचे कारण देत स्विटमार्टवाले नेहमीच कोणत्या ना कोणत्या पदार्थांमध्ये वाढ करीत असतात. त्यामुळे याच्या दरवाढीवर संबंधित विभागाने नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. पदार्थाच्या गुणवत्तेसह त्याचे अतिरिक्त दर घेणाऱ्यावर कारवाई करणे गरजेचे आहे.