मिशन शक्ती, सेवाद्वारे लौकिक वाढवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2018 12:29 AM2018-08-17T00:29:20+5:302018-08-17T00:30:12+5:30

आगामी काळात जिल्ह्यात मिशन शक्ती व मिशन सेवा या उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करुन जिल्ह्याच्या नावलौकिकात भर घालावा, जिल्ह्यातील आदिवासी आश्रमशाळेच्या मुलांनी एव्हरेस्ट सर केलेल्या भीमपराक्रमाचा उल्लेख दिल्लीतील लाल किल्यावरून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज भाषणात केला.

Increase the power of the mission, the service through the service | मिशन शक्ती, सेवाद्वारे लौकिक वाढवा

मिशन शक्ती, सेवाद्वारे लौकिक वाढवा

Next
ठळक मुद्देसुधीर मुनगंटीवार : जिल्हाधिकारी कार्यालयातील मुख्य ध्वजारोहण

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : आगामी काळात जिल्ह्यात मिशन शक्ती व मिशन सेवा या उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करुन जिल्ह्याच्या नावलौकिकात भर घालावा, जिल्ह्यातील आदिवासी आश्रमशाळेच्या मुलांनी एव्हरेस्ट सर केलेल्या भीमपराक्रमाचा उल्लेख दिल्लीतील लाल किल्यावरून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज भाषणात केला. हा गौरव पे्ररणादायी असल्याचे प्रतिपादन राज्याचे वित्त, नियोजन व वनेमंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या मुख्य ध्वजारोहण सोहळ्यात केले.
यावेळी आमदार नाना शामकुळे, महापौर अंजली घोटेकर, जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर, मनपा आयुक्त संजय काकडे, मुख्य वनसंरक्षक विजय शेळके, स्वातंत्रसैनिक, गणमान्य व्यक्ती व प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. लाल किल्ल्यावरील ध्वजारोहणाच्या आपल्या भाषणात सुरुवातीला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जिल्ह्यातील एव्हरेस्ट सर करणाऱ्या दहा आदिवासी विद्यार्थ्यांचा गौरव केला. संधी मिळाल्यानंतर आदिवासी विद्यार्थीदेखील हा भीमपराक्रम केल्याचा इतिहासात कायम उल्लेख केला जाईल, असे प्रधानमंत्र्यांनी विषद केले. ना. मुनगंटीवार यांनी या उल्लेखाला ऐतिहासिक संबोधून प्रधानमंत्र्यांचे आभार मानले. येणाºया काळात भारतातील ७१२ जिल्ह्यांमध्ये जात, पात, धर्म, वंश आदी सर्व भेदाच्या पलिकडे जावून गुणवत्तेच्या आधारावर जिल्ह्याचा नावलौकिक वाढवायचा असून प्रेरणादायी जिल्हा म्हणून चंद्रपूरचे नाव देशात घेतले जाईल, यासाठी तत्पर होण्याचे आवाहनही केले. त्यांनी मिशन शक्ती व मिशन सेवा या दोन महत्त्वपूर्ण उपक्रमाची घोषणा केली. मिशन शक्तीअंतर्गत चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील सर्वस्तरातील क्षमतावान शंभर खेळाडूंना निवडण्यात येईल. त्या माध्यमातून सहा निवडक खेळामध्ये या खेळाडूंना आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रशिक्षण दिले जाईल. २०१४ मध्ये आॅलिम्पिकसाठी गुणवान खेळाडूंना तयार केले जाईल, असेही स्पष्ट केले. सर्व तालुक्यातील क्रीडा संकूल २५ डिसेंबरपर्यंत कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. चंद्रपूरमध्ये स्वातंत्रवीर बाबुराव शेडमाके यांच्या स्मृतीत भव्य क्रीडा संकुल उभारण्याची घोषणाही केली. अभ्यासिकेतून आयएएस, आयपीएससाठी विद्यार्थी पात्र ठरतील.

Web Title: Increase the power of the mission, the service through the service

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.