जिल्ह्यात आरटीपीसीआर तपासण्या वाढवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2021 04:26 AM2021-02-12T04:26:54+5:302021-02-12T04:26:54+5:30
जिल्हाधिकारी कार्यालयातील वीस कलमी सभागृहात डॉ. म्हैसेकर यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील कोरोना उपाययोजनेचा आढावा घेतला. यावेळी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, ...
जिल्हाधिकारी कार्यालयातील वीस कलमी सभागृहात डॉ. म्हैसेकर यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील कोरोना उपाययोजनेचा आढावा घेतला. यावेळी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, अपर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयसाचे प्रभारी अधिष्ठाता डॉ. सुरपाम, सहायक जिल्हाधिकारी रोहन घुगे, पोलीस उपअधीक्षक शेखर देखमुख, निवासी उपजिल्हाधिकारी मनोहर गव्हाड, जिल्हा लसीकरण अधिकरी डॉ. संदीप गेडाम, डॉ. सुधीर मेश्राम, डॉ. प्रकाश साठे प्रामुख्याने उपस्थित होते.
डॉ. म्हैसेकर यांनी ॲन्टीजेन तपासणीत रूग्णांचा अहवाल निगेटिव्ह आल्यावरही काही रूग्णांमध्ये लक्षणे दिसत असल्यास त्यांची आटीपीसीआर तपासणी करण्याचे सांगितले. जिल्ह्यात माहे जानेवारीमध्ये नवीन पाॅझिटिव्ह रुग्णंची संख्या कमी असली तरी त्या तुलनेत मृत्यू दर जास्त दिसून येत असल्याने कोरोना रूग्णांचा मृत्यू दर कमी करण्यासाठी तातडीने उपचार सुविधा उपलब्ध करण्याचे त्यांनी सांगितले.
राज्यात कोव्हीड-१९ आजाराचे प्रमाण कमी होत असले, तरी निष्काळजीपणे वागणूक असल्यास याचे गंभीर स्वरूप दिसून येतील, याबाबत नागरिकांना सतर्क करण्याचे आवाहन त्यांनी जिल्हा प्रशासन तसेच आरोग्य यंत्रणेला केले. राज्यात १५ फेब्रुवारी पासून महाविद्यालये सूरू होत आहे. जिल्हयात मृत्यूचे जास्त प्रमाण हे १९ ते ५० या वयोगटातील आहे. त्यामुळे महाविद्यालय याबाबत गांभिर्याने लक्ष देऊन कोरोनाचा प्रसार होणार नाही, याबाबत काळजी घेण्याचे तसेच सर्व महाविद्यालयात सॅनेटायजर, मास्क आणि हॅन्डवॉश या सर्व सुविधा उपलब्ध असल्याबाबत खात्री करुन घेण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी प्रशासनाला केले.