ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या सफारी शुल्कात वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2018 11:29 AM2018-01-09T11:29:18+5:302018-01-09T12:29:07+5:30
पर्यटकांसाठी आकर्षणाचा विषय ठरलेला ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील सफारी शुल्कात ५ टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे.
ठळक मुद्दे५ टक्क्यांनी वाढले व्याघ्र दर्शनाचे दर
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : पर्यटकांसाठी आकर्षणाचा विषय ठरलेला ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील सफारी शुल्कात ५ टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे. क्षेत्र संचालकांनी नवे शुल्क जाहीर केले असुन पर्यटकांना आता दुप्पटीने बोजा सहन करावा लागणार आहे.
ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या सफारीसाठी जगभरातून आॅनलाईन नोंदणी केली जाते. साधारण व तत्काळ आरक्षणाचे शुल्क दुप्पटीने वाढविले. शिवाय सोमवारपासून स्थळ बुकिंग बंद करण्यात आले आहे.
ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाने पहिल्यांदाच ५ टक्क्यांनी वाढ केल्याने पर्यटकांची संख्या रोडावण्याची भीती व्यक्त केली जात आहे.