४८० बंधाऱ्यामुळे वनातील भूजल पातळीत वाढ
By Admin | Published: July 18, 2014 12:00 AM2014-07-18T00:00:25+5:302014-07-18T00:00:25+5:30
चंद्रपूर वनवृत्ताअंतर्गत येणाऱ्या चंद्रपूर, ब्रह्मपुरी व मध्यचांदा या विभागातील वनक्षेत्रात एक कोटी ६१ लाख रुपये खर्च करुन बांधण्यात आलेल्या ४८० दगडी ग्रॅबियन बंधाऱ्यामुळे वनातील भुजल पातळीत
चंद्रपूर : चंद्रपूर वनवृत्ताअंतर्गत येणाऱ्या चंद्रपूर, ब्रह्मपुरी व मध्यचांदा या विभागातील वनक्षेत्रात एक कोटी ६१ लाख रुपये खर्च करुन बांधण्यात आलेल्या ४८० दगडी ग्रॅबियन बंधाऱ्यामुळे वनातील भुजल पातळीत वाढ झाली असून वन्यजीवांना वनक्षेत्रात पाणी उपलब्ध झाले आहे.
मानव वन्यजीव संघर्ष कमी करणे तसेच वन्यजीवांना वनक्षेत्रात पाणी उपलब्ध करुन देणे त्याचप्रमाणे वनक्षेत्रातील भुजल पातळी वाढविण्याच्या दृष्टीने २०११-१२, २०१२-१३ व २०१३-१४ या तीन वर्षात जल व मृदसंधारणाकरिता ४८० दगडी- ग्रॅबियन बंधारे बांधण्यात आले. १३ वा वित्तीय आयोग, कॅम्पा व जिल्हा नियोजन समिती इत्यादीच्या माध्यमातून सिमेंट बंधारे, वन तलाव, पाण्याच्या स्त्रोताचे खोलीकरण व खोद तळे या प्रमाणे एकूण १५८ कृत्रीम पानवठे व ४८० बंधारे असे एकूण ६३८ जल व मृदसंधारणाचे काम करण्यात आले. यासाठी एक कोटी ६१ लाख ४८हजार खर्च करण्यात आला.
सिमेंट बंधारे ३०, वनतलाव ८, खोलीकरण ८१, पाणी साठवण तलाव ३९ व बंधारे ४८० असे ६३८ कामे मागील तीन वर्षात करण्यात आले. सन २०१४-१५ मध्ये सिमेंट बंधारे २४ वन तलाव ४, ग्रॅबियन व दगडी बंधारे ६०० असे एकूण ६२८ कामे प्रस्तावित आहेत.
त्याकरिता एक कोटी दोन लाख ५० हजार चालू वर्षाच्या अनुदानातून मंजूर आहेत. ही कामे झाल्यानंतर वनक्षेत्रातील भूजल पातळीत आणखी वाढ होणार आहे.
विभागातील वनक्षेत्रात उन्हाळ्यातपाणी उपलब्ध असलेले नैसर्गिक व कृत्रीम एकूण ५३ पानवठे चंद्रपूर वनविभागातर्फे बांधण्यात आले आहे. (प्रतिनिधी)