धान पिकावर वाढला गादमाशीचा प्रादुर्भाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2021 04:29 AM2021-08-15T04:29:14+5:302021-08-15T04:29:14+5:30
सिंदेवाही : तालुक्यात अजूनही पावसाचे प्रमाण समाधानकारक नाही. शेतकऱ्यांनी मोटारपंपाच्या भरवशावर धानाची रोवणी कशीबशी आटोपली. यात शेतकरीवर्ग यशस्वी झाला. ...
सिंदेवाही : तालुक्यात अजूनही पावसाचे प्रमाण समाधानकारक नाही. शेतकऱ्यांनी मोटारपंपाच्या भरवशावर धानाची रोवणी कशीबशी आटोपली. यात शेतकरीवर्ग यशस्वी झाला. धान रोवणी हिरवी होताच मागील बारा दिवसांपासून पावसाने दांडी मारली. अशातच वातावरणातील बदलामुळे गादमाशीचा प्रादुर्भाव पिकावर होत आहे. यामुळे आता उत्पादन हाती येईल की नाही, अशी चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे.
गादमाशी ही लांब पायाची, तपकिरी रंगाची, उग्र वास सोडणारी कीड आहे. ती खोडाच्या आत शिरून धानाचे अंकुर कुरतडताना तोंडातून सिसो डो जन नावाचे द्रव्य धानावर सोडत असते. या विषारी द्रव्याने अंकुरणारा धान फुगून त्याला कांद्यासारखा धान पालवीचा पोंगा तयार होतो. तो पिवळसर पांढरा रंगाचा असतो. त्या धानाला केव्हाच लोंब येत नाही. परिणामी धान उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट होते, अशी माहिती काही अनुभवी शेतकऱ्यांनी दिली. या गादमाशी रोगावर वेळीच नियंत्रण होणे गरजेचे आहे.