मोबाइलमुळे मुलांमध्ये वाढला चिडचिडेपणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2021 04:31 AM2021-03-09T04:31:00+5:302021-03-09T04:31:00+5:30
कोरोनाच्या संकटामुळे ऑनलाइन शिक्षणावर अधिक भर दिला जात आहे. आपला मुलगा इतर मुलांप्रमाणे अभ्यासात अग्रेसर राहावा, म्हणून पालकांनी सुरुवातीस ...
कोरोनाच्या संकटामुळे ऑनलाइन शिक्षणावर अधिक भर दिला जात आहे. आपला मुलगा इतर मुलांप्रमाणे अभ्यासात अग्रेसर राहावा, म्हणून पालकांनी सुरुवातीस तासिकापुरताच मोबाइल दिला. मात्र, वर्ष उलटत आले, तरी ऑनलाइन शिक्षण सुरूच असल्याने, नाईलाजास्तव बहुतांश पालकांनी मुलांनी स्वतंत्र मोबाइल दिला आहे. ही मुले दिवसातील अधिकाअधिक तास मोबाइलवरच व्यस्त राहत आहेत. परिणामी, मैदानी खेळापासून ती दुरावली आहेत. सततच्या मोबाइल वापरामुळे मुलांमध्ये एकाग्रता कमी होऊन चिडचिडेपणा वाढला आहे, शिवाय डोकेदुखी, डोळ्याचे आजार उद्भवत असल्याचे तज्ज्ञ डॉक्टरांकडून सांगण्यात येत आहे.
बॉक्स
विटीदांडू गायब
पूर्वी विटीदांडू, लगोरी, कबड्डी, कुस्ती, लपाछपी हे खेळ लोकप्रिय होते. मैदानी खेळातून मुलांचे आरोग्य सुरळीत राहत होते, परंतु आता मैदान खेळ खेळण्याऐवजी टीव्ही बघणे, मोबाइलवर गेम खेळणे आदींमध्ये मुले व्यस्त राहत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे अनेकांना लहान वयात मोठमोठ्या भिंगाचा चष्मा लागल्याचे दिसून येते.
बॉक्स
कोरोनामुळे मोबाइल गेम खेळण्याचे प्रमाण वाढले
सतत मोबाइल वापरामुळे लहान मुलांमध्येही डोळ्याच्या समस्या वाढत आहेत. प्रत्येकांच्या डोळ्यांना नैसर्गिक संरक्षण आहे. त्यामुळे मोबाइल, लॅपटॉपमध्ये आवश्यक्तेनुसार ब्राइटनेस ठेवावा, १५-२० मिनिटे स्क्रिनवर सतत काम केल्यानंतर दूरवर बघण्याचा प्रयत्न करावा, काही क्षणासाठी डोळ्यांना मिटून डोळ्यांना आराम द्यावा, त्रास वाटल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
- डॉ.चेतन खुटेमाटे, नेत्ररोज तज्ज्ञ, चंद्रपूर
कोट
शिक्षणासाठी नाईलाजास्तव मुलांना मोबाइल द्यावा लागत आहे, परंतु जास्त वेळ मोबाइलचा वापर केल्याने, मुलांमध्ये चिडचिडेपणा वाढण्याची शक्यता असते. शाळेमध्ये मुलांचा इतर मित्रांशी संबंध यायचा, परंतु आता संबंध येत नसल्याने संवाद होत नाही. त्यामुळे चैतन्य निर्माण होत नाही. आत्मविश्वास कमी होतो. पालकांनी मुलांकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
- डॉ.विवेक बांबोळे, मानसिक रोग तज्ज्ञ, चंद्रपूर
कोट
---