खाकीची रोगप्रतिकारक शक्ती वाढली; दुसऱ्या लाटेत कोरोनावर मात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2021 04:26 AM2021-05-22T04:26:26+5:302021-05-22T04:26:26+5:30
चंद्रपूर जिल्ह्यात १९४ पोलीस अधिकारी तर २५०० पोलीस कर्मचारी कार्यरत आहेत. कोरोनाच्या पहिल्या लाटेपासूनच पोलीस विभागावर मोठा ताण असल्याचे ...
चंद्रपूर जिल्ह्यात १९४ पोलीस अधिकारी तर २५०० पोलीस कर्मचारी कार्यरत आहेत. कोरोनाच्या पहिल्या लाटेपासूनच पोलीस विभागावर मोठा ताण असल्याचे दिसून येत आहे. चौका-चौकात नाकाबंदी, बाहेरून येणाऱ्यांची तपासणी, कोविड सेंटरमध्ये बंदोबस्त आदी ठिकाणी पोलिसांची भूमिका महत्त्वाची आहे. त्यामुळे पोलीस मोठ्या प्रमाणात बाधित होत असल्याचे दिसून येत आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील --- पोलीस अधिकारी व कर्मचारी कोरोनाबाधित झाले. यातील --- कर्मचाऱ्यांनी पहिल्या लाटेत तर दुसऱ्या लाटेत -- कर्मचारी बाधित झाले आहे. सध्या --- पोलिसांवर उपचार सुरू आहे.
बॉक्स
प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी रोज व्यायाम, ग्रीन ज्यूस
पोलीस विभाग अगोदरपासूनच कसरत व व्यायम करीत असून फिटनेसकडे लक्ष देत असतात. आता कोरोनापासून ते पुन्हा ॲक्टिव्ह झाले असून दररोज व्यायाम, योग करीत आहेत. यासोबतच ग्रीन ज्यूस, गवती चहा, आवळ्याचा ज्यूस व आयुर्वेदिक काढा पिण्याकडे पोलिसांचा भर आहे.
----
पूर्वीपासूनच योग करायची सवय आहे. आता तर दररोज सकाळी अर्धा तास योग करीत असतो. सायंकाळी ग्राऊंडवर व्यायाम व शारीरिक कसरत असतो. यासोबतच आरोग्य विभागाने सुचविलेल्या आयुर्वेदिक काढा नियमित प्राशन करीत असतोे.
- संदीप कापडे, पोलीस उपनिरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर
---
कर्तव्य बजावताना अनेकांशी संपर्क येतो. त्यामुळे काळजी घेतच कर्तव्य बजावत असतो. पोलीस विभागात असल्याने नियमित व्यायामाची सवय आहे. यासोबतच आता मास्कचा वापर, सॅनिटायझरने हात स्वच्छ धुणे व संतुलित व पौष्टिक आहार घेणे सुरू आहे.
-विजय पंचबुद्धे, पोलीस उपनिरीक्षक, चंद्रपूर
-------