गाव पातळीवर पुढाऱ्याच्या भेटीगाठी वाढल्या---------( 45 ग्रामपंचायतीत रंगणार चुरस: 60 हजार नागरिक बजा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2020 04:26 AM2020-12-24T04:26:07+5:302020-12-24T04:26:07+5:30
गाव पातळीवर पुढाऱ्याच्या भेटीगाठी वाढल्या---------( 45 ग्रामपंचायतीत रंगणार चुरस: 60 हजार नागरिक बजावणार मतदानाचा हक्क) ------ ...
गाव पातळीवर पुढाऱ्याच्या भेटीगाठी वाढल्या---------( 45 ग्रामपंचायतीत रंगणार चुरस: 60 हजार नागरिक बजावणार मतदानाचा हक्क) ------ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचे बिगुल वाजताच ग्रामीण भागातील पुढारी सक्रीय झाले आहे. निवडणूक जिंकण्यासाठी आराखडे तयार केले जात आहे. मतदारांच्या भेटीगाठी घेणे सुरू झाले आहे. तालुक्यातील पंचेचाळीस ग्रामपंचायतीच्या निवडणूक घेतली जात आहे. कोरोना उद्रेक झाल्यानंतर 17 मार्चला होणाऱ्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका स्थगिती करण्यात आल्या मात्र कोरोना चा उद्रेक कमी झाल्याने आता डिसेंबर 2020 अखेर मुदत संपणाऱ्या वनव्याने स्थळ स्थापित होणाऱ्या सर्व निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून यात 60000 मतदार आपला हक्क बजावणार आहेत. संसर्गजन् कोरोना आजाराच्या सावटात इतिहासातील पहिलीच निवडणूक आहे. नियमाचे पालन करावे, तालुक्यातील 52 ग्रामपंचायती पैकी 45 ग्रामपंचायतीमध्ये 15 जानेवारी शुक्रवार रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. तत्पूर्वी निवडणूक कार्यक्रमास नाम दर्शिका पत्र मागविण्याची व सादर करण्याची तारीख 29 ते 30 डिसेंबर नांग दर्शक पत्र मागे घेण्याची तारीख 4 जानेवारी 2021 त्यानंतर निवडणूक चिन्ह वाटप 15 जानेवारीला, मतदान 18 जानेवारीला, मतमोजणी होणार असल्याचे प्रशासनाने कळविले आहे.