गाव पातळीवर पुढाऱ्याच्या भेटीगाठी वाढल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2020 04:26 AM2020-12-24T04:26:13+5:302020-12-24T04:26:13+5:30
सिंदेवाही : ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचे बिगुल वाजताच ग्रामीण भागातील पुढारी सक्रीय झाले आहे. निवडणूक जिंकण्यासाठी आराखडे तयार केले जात ...
सिंदेवाही : ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचे बिगुल वाजताच ग्रामीण भागातील पुढारी सक्रीय झाले आहे. निवडणूक जिंकण्यासाठी आराखडे तयार केले जात आहे. मतदारांच्या भेटीगाठी घेणे सुरू झाले आहे.
तालुक्यातील ४५ ग्रामपंचायतीच्या निवडणूक घेतल्या जात आहे. कोरोना उद्रेक झाल्यानंतर १७ मार्चला होणाऱ्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका स्थगिती करण्यात आल्या. मात्र कोरोनाचा उद्रेक कमी झाल्याने आता डिसेंबर २०२० अखेर मुदत संपणाऱ्या व नव्याने स्थापित होणाऱ्या सर्व निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून यात ६० हजार मतदार आपला हक्क बजावणार आहेत. संसर्गजन्य कोरोना आजाराच्या सावटात इतिहासातील पहिलीच निवडणूक आहे. नियमाचे पालन करणे गरजेचे आहे. तालुक्यातील ५२ ग्रामपंचायतीपैकी ४५ ग्रामपंचायतीमध्ये १५ जानेवारी रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. १८ जानेवारीला मतमोजणी होणार असल्याचे प्रशासनाने कळविले आहे.