लसीकरणाचा टक्का वाढल्याने जिल्ह्यातील निर्बंध हटविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2022 05:00 AM2022-02-03T05:00:00+5:302022-02-03T05:00:52+5:30

 राज्य शासनाने काेरोना प्रतिबंधासाठी यापूर्वी निर्बंध लागू केले होते. त्यातील  निकषांत बदल करण्यात आला. आता ३० जानेवारी २०२२ रोजी पहिल्या डोसचे प्रमाण ९० टक्क्यांपेक्षा जास्त तसेच दोन्ही डोसचे प्रमाण ७० टक्के असेल, अशा जिल्ह्यांत निर्बंधात शिथिलता देण्याच्या शासनाच्या सूचना आहे. त्यानुसार जिल्ह्यात लसीकरणाचा पहिला डोस ९४.७१ टक्के तर दुसऱ्या डोसची टक्केवारी ७२.२१ टक्के आहे. 

Increased percentage of vaccinations lifted restrictions in the district | लसीकरणाचा टक्का वाढल्याने जिल्ह्यातील निर्बंध हटविले

लसीकरणाचा टक्का वाढल्याने जिल्ह्यातील निर्बंध हटविले

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा टक्का वाढून राज्य शासनाच्या निकषात पात्र ठरल्याने कोरोना प्रतिबंधासाठी यापूर्वी लागू केलेले निर्बंध  हटविण्याचा आदेश जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी आज जारी केला. या आदेशानुसार विवाहाला आता २०० जण उपस्थित राहू शकतात. शिवाय, खुल्या सार्वजनिक कार्यक्रमांनाही परवागनी देण्यात आली आहे.
 राज्य शासनाने काेरोना प्रतिबंधासाठी यापूर्वी निर्बंध लागू केले होते. त्यातील  निकषांत बदल करण्यात आला. आता ३० जानेवारी २०२२ रोजी पहिल्या डोसचे प्रमाण ९० टक्क्यांपेक्षा जास्त तसेच दोन्ही डोसचे प्रमाण ७० टक्के असेल, अशा जिल्ह्यांत निर्बंधात शिथिलता देण्याच्या शासनाच्या सूचना आहे. त्यानुसार जिल्ह्यात लसीकरणाचा पहिला डोस ९४.७१ टक्के तर दुसऱ्या डोसची टक्केवारी ७२.२१ टक्के आहे. 
त्यामुळे जिल्ह्यातील यापूर्वीच्या सवलती लागू करण्यात येत असल्याचा आदेश जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी जारी केला आहे.

सर्व उद्याने व बगीचे फुलणार
स्थानिक प्राधिकरणांनी निश्चित केलेल्या वेळेनुसार उद्याने,  जलतरण तलाव, जल उद्याने, बगीचे, मनाेरंजन पार्क, थीम पार्क, रेस्टॉरंट, थिएटर, नाट्यगृहे ५० टक्के क्षमतेसह सुरू  राहणार आहेत. शहरी भागाचे अधिकार हे मनपा आयुक्त, मुख्याधिकारी नगर परिषद, पंचायत यांना व ग्रामीण भागासाठी तहसीलदारांना देण्यात आले.

अन्यथा कारवाईचा बडगा
शहरी व ग्रामीण भागावर नियंत्रण ठेवण्याचे अधिकार उपविभागीय अधिकारी (महसूल) यांना राहतील. भजन आणि इतर सर्व सांस्कृतिक आणि करमणुकीच्या कार्यक्रमांना हॉल, पंडालच्या ५० टक्के क्षमतेसह परवानगी राहील. यासाठी संबंधित तहसीलदारांची परवानगी अनिवार्य असेल, अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागणार, अशा सूचना प्रशासनाने दिल्या.

अशा आहेत सवलती  
राष्ट्रीय उद्याने व सफारी नियमित वेळेनुसार ऑनलाईन तिकीटासह खुली राहतील. परंतु भेटी देणाऱ्यांनी पूर्णपणे लसीकरण अनिवार्य असेल. ब्युटी पार्लर, केश कर्तनालयासाठी लागू केलेल्या समान निर्बंधांच्या अधिन स्पा ५० टक्के क्षमतेसह कार्यरत राहू शकतात. अंत्यसंस्कारात सहभागी होणाऱ्या व्यक्तीच्या संख्येवर आता कोणतीही मर्यादा नाही.

लसीकरणात जिल्हा पात्र ठरल्याने काही निर्बंध शिथिल करण्यात आले; मात्र नागरिकांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी. जिथे शिथिलता त्यानुसार दैनंदिन व्यवहार करावे; मात्र निर्बंध असलेल्या क्षेत्रात नियमांचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे.
अजय गुल्हाने, 
जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण

 

Web Title: Increased percentage of vaccinations lifted restrictions in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.