धोक्यात वाढ, रूग्णसंख्या 86 पार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2021 05:00 AM2021-03-08T05:00:00+5:302021-03-07T23:40:01+5:30
मागील काही दिवसांपासून कोरोना संकट पुन्हा तोंड वर काढत आहे. त्यामुळे प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली असून विविध रुग्णालयातील कोरोना रुग्णांसाठी आवश्यक सुविधा अपडेट करणे सुरु केले आहे. जिल्ह्यात वरोरा तालुक्यात सातत्याने रुग्ण संख्या वाढत आहे. विशेष म्हणजे, यवतमाळ तसेच वर्धा जिल्हयात रुग्ण वाढीमुळे चंद्रपूर जिल्ह्यातील प्रशासकीय यंत्रणेवर ताण आला आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहून कोरोनाविषयक नियमांना पाळणे अत्यावश्यक झाले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : जिल्ह्यात कोरोनाचा धोका वाढत आहे. त्यामुळे प्रत्येकांनी काळजी घेणे गरजेचे आहे. मात्र काही नागरिक आजही ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, रविवारी तब्बल ८६ रुग्णांची वाढ झाली असून सध्या स्थितीत विविध रुग्णांलयांमध्ये ६३२ कोरोना रुग्ण उपचार घेत आहे. विशेष म्हणजे, वरोरा तालुक्यातील रुग्ण संख्या ४० तर चंद्रपूर महापालिका क्षेत्रात १९ नव्याने रुग्णांची भर पडली आहे.
मागील काही दिवसांपासून कोरोना संकट पुन्हा तोंड वर काढत आहे. त्यामुळे प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली असून विविध रुग्णालयातील कोरोना रुग्णांसाठी आवश्यक सुविधा अपडेट करणे सुरु केले आहे. जिल्ह्यात वरोरा तालुक्यात सातत्याने रुग्ण संख्या वाढत आहे. विशेष म्हणजे, यवतमाळ तसेच वर्धा जिल्हयात रुग्ण वाढीमुळे चंद्रपूर जिल्ह्यातील प्रशासकीय यंत्रणेवर ताण आला आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहून कोरोनाविषयक नियमांना पाळणे अत्यावश्यक झाले आहे. मागील २४ तासात ४२ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे, तर ८६ कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडली आहे.
आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या २५ हजार २०२ वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या २३ हजार १७० झाली आहे. सध्या ६३२ बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत दोन लाख २२ हजार ५८३ नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी एक लाख ९६ हजार २४४ नमुने निगेटीव्ह आले आहेत. सध्या ज्येष्ठ नागरिकांसाठी कोरोना लस उपलब्ध करून देण्यात आली असून नोंदणी करणे अत्यावश्यक आहे.
माझे कार्यक्षेत्र, माझी जबाबदारी’ अभियान
जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या नियंत्रणात ठेवण्यासाठी कोरोनाविरुद्धच्या लढ्यात जिल्हा प्रशासन व स्थानिक स्वराज्य संस्थेतील लोकप्रतिनिधी यांच्यासह सर्वच घटकांचा सहभाग आवश्यक असल्याचे मत जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी व्यक्त केले. ‘माझे कार्यक्षेत्र, माझी जबाबदारी’ या उपक्रमांतर्गत जिल्हाधिकारी अजय गुल्हाने व मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले यांनी बल्लारपूर व राजुरा विभागातील लोकप्रतिनिधी व शासकीय अधिकारी यांच्याशी संवाद साधला. कोविड १९च्या दुसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेता, कोविडची तपासणी करून घेणे, संपर्कात आलेल्या सर्व व्यक्तींची माहिती देणे, मास्कचा वापर, सामाजिक अंतर राखणे, वारंवार हात धुणे आवश्यक आहे.