वाढीव पाणी पुरवठ्याचे काम संथगतीने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2018 11:43 PM2018-04-30T23:43:58+5:302018-04-30T23:44:08+5:30

चंद्रपूरकरांवर सध्या पाणी संकट ओढविले आहे. काही ठिकाणी एक दिवसाआड तर काही ठिकाणी तीन-चार दिवसाआड पाणी पुरवठा केला जात आहे. यावर मात करण्यासाठी मनपाने वाढीव पाणी पुरवठा योजनेंतर्गत शहरात पाणी आणण्याचे नियोजन केले होते. त्याचेही कामही सुरू आहे. मात्र हे काम अत्यंत संथगतीने सुरू असल्याने अपेक्षित वेळ निघून गेल्यानंतरही वाढीव पाणी पुरवठा सुरू झालेला नाही.

Increased water supply work is slow | वाढीव पाणी पुरवठ्याचे काम संथगतीने

वाढीव पाणी पुरवठ्याचे काम संथगतीने

Next
ठळक मुद्देचंद्रपूरकर पाण्यामुळे त्रस्त : आणखी एक महिना लागणार, अनेक भागात तीन-चार दिवसाआड पाणी पुरवठा

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : चंद्रपूरकरांवर सध्या पाणी संकट ओढविले आहे. काही ठिकाणी एक दिवसाआड तर काही ठिकाणी तीन-चार दिवसाआड पाणी पुरवठा केला जात आहे. यावर मात करण्यासाठी मनपाने वाढीव पाणी पुरवठा योजनेंतर्गत शहरात पाणी आणण्याचे नियोजन केले होते. त्याचेही कामही सुरू आहे. मात्र हे काम अत्यंत संथगतीने सुरू असल्याने अपेक्षित वेळ निघून गेल्यानंतरही वाढीव पाणी पुरवठा सुरू झालेला नाही.
चंद्रपूरची लोकसंख्या साडेचार लाखांच्या घरात पोहचली आहे. चंद्रपूरकरांना महानगरपालिकेच्या माध्यमातून इरई धरणातून पाणी पुरवठा केला जातो. मात्र सध्या इरई धरणात अत्यंत कमी जलसाठा शिल्लक आहे. याच साठ्यातून चंद्रपूर वीज केंद्रासाठीही पाण्याचा उपसा केला जातो. त्यामुळे सध्या शहरात एक दिवसाआड पाणी पुरवठा करण्याचा निर्णय महानगरपालिकेने घेतला. मात्र अनेक वॉर्डात तीन-चार दिवस नळाला पाणीच येत नसल्याची बोंब आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई येथे चंद्रपूर येथील पाणी समस्येवर बैठक आयोजित केली होती. त्या बैठकीमध्ये चंद्रपूरचा पाणी पुरवठा सुरळीत ठेऊ, असे अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले होते. २४ एप्रिल २०१८ पासून वाढीव पाणी पुरवठा सुरु करू, असेही त्या बैठकीमध्ये सांगण्यात आले होते. मात्र तसे झाले नाही.

जोरगेवारांकडून पाहणी
वाढीव पाणी पुरवठ्याला विलंब होत असल्याने शिवसेना नेते किशोर जोरगेवार यांनी धानोरा नदीवरील वाढीव पाणी पुरवठा योजनेच्या सुरु असलेल्या कामाची पाहणी केली असता हे काम पूर्ण होण्यासाठी आणखी एक महिना कालावधी लागणार आहे, असे निदर्शनास आले. यावेळी नगरसेवक विशाल निंबाळकर, अमोल शेंडे, इरफान शेख, हर्षद कानमपल्लीवार, राशीद हुसैन, विलास सोमलवार, विनोद अनंतवार, शंकर दंतुलवार, अशपाक खान, बादल हजारे, बबलू मेश्राम, यांची उपस्थिती होती. दरम्यान, जीवन प्राधिकरणाचे अधीक्षक अभियंता जगदाळे यांनी आतापर्यंत सहा कि.मी. अंतरा पर्यंत पाण्याची टेस्टिंग केली आहे, असे सांगितल्याचे किशोर जोरगेवार यांनी म्हटले आहे. नदीच्या पात्रामध्ये पाणी नाही, तर चंद्रपूर येथील जनतेला कुठून पाणी देणार, असा प्रश्नही जोरगेवार यांनी उपस्थित केला आहे. इतक्या मोठ्या वाढीव पाणी पुरवठा योजनेचे काम नदीवर चालू आहे. पण कामाच्या ठिकाणी एकही अधिकारी किंवा कंत्राटदाराचे सुपरवायझर, इंजिनिअर कोणीही उपस्थित राहत नाही. केवळ चार ते पाच कामगारांच्या भरोशावर काम चालू आहे, असा आरोप किशोर जोरगेवार यांनी केला आहे. चंद्रपूरच्या जनतेला जून महिन्यापर्यंत सुरळीत पाणी मिळाले नाही तर शिवसेना रस्त्यावर उतरेल, असा इशारा जोरगेवार यांनी दिला आहे.

Web Title: Increased water supply work is slow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.