टेकामांडवा ते भारी रस्त्यावर वाढते अपघात
By admin | Published: April 10, 2017 12:48 AM2017-04-10T00:48:20+5:302017-04-10T00:48:20+5:30
भारी हे गाव तेलंगणाच्या सीमेलगत असून टेकामांडवा येथून १५ कि. मी.अंतरावर आहे. या रस्त्यावर अपघातांचे प्रमाण वाढले आहे.
टेकामांडवा : भारी हे गाव तेलंगणाच्या सीमेलगत असून टेकामांडवा येथून १५ कि. मी.अंतरावर आहे. या रस्त्यावर अपघातांचे प्रमाण वाढले आहे.
या गावात प्राथमिक शाळा, एक महाविद्यालय कालेज आणि उपपोलीस स्टेशनही आहे. येथील गंगामाता देवस्थान प्रसिद्ध आहे. तेथे वाहने घेऊन दूरचे भाविकभक्त येत असतात. हे गाव आदिवासी बहुल आहे. टेकामांडवा ते भारी हा रस्ता उंचसखल असून दऱ्याखोऱ्यांचा आहे. तसेच अतिसंवेदनशील भाग असल्याने रस्ता चांगला असणे गरजेचे आहे. मात्र या रस्त्यावर खड्डेच खड्डे असल्याने अपघातांचे प्रमाण वाढले आहे.
रस्त्यावरील खड्ड्यांमुळे वाहनचालक जीव मुठीत घेऊन वाहतूक करतो. विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी अशा रस्त्यावरून कसरत करावी लागत आहे. रस्ता खराब असल्यामुळे विद्यार्थी परीक्षेला वेळेवर पोहोचू शकत नाही. हा आदिवासी लोकांचा भाग रस्त्याच्या दुरवस्थेमुळे मुख्य व्यापारपेठेच्या प्रवाहापासून अलिप्त आहे.
शासन आदिवासींच्या विकासासाठी प्रयत्न करीत असताना हा रस्ता बरोबर नसल्याने आदिवासी प्रगतीपासून दूर जात आहेत. (वार्ताहर)