वाढीव पदावरील शिक्षकांचे बेमुदत आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2021 04:32 AM2021-09-06T04:32:25+5:302021-09-06T04:32:25+5:30
कनिष्ठ महाविद्यालयीन वाढीव पदावरील शिक्षक गेली दहा ते बारा वर्षांपासून अध्यापनाचे पवित्र कार्य विनावेतन करीत आहेत. अलीकडेच स्वातंत्र्यदिनीही या ...
कनिष्ठ महाविद्यालयीन वाढीव पदावरील शिक्षक गेली दहा ते बारा वर्षांपासून अध्यापनाचे पवित्र कार्य विनावेतन करीत आहेत. अलीकडेच स्वातंत्र्यदिनीही या शिक्षकांनी वाढीव पदांच्या मान्यतेसाठी आत्मक्लेश आंदोलन केले होते. यापूर्वीही अनेकदा आझाद मैदान मुंबई, पुणे संचालक कार्यालय, तसेच विविध उपसंचालक कार्यालयाच्या समोरही अनेक वेळा आंदोलने केली आहेत. परंतु, आजपर्यंत या आंदोलनांची दखल शासनाने घेतली नाही.
वारंवार माहिती मागविणे, प्राप्त माहितीमध्ये त्रुटी काढणे, मान्यता व वेतनासाठी चालढकल करणे, या सगळ्या वेळकाढू प्रकारामुळे विनावेतन काम करणारे शिक्षक मेटाकुटीस आले असून, त्यांची आर्थिक स्थिती अत्यंत दयनीय झालेली आहे. वाढीव पदावरील शिक्षकांचे हे आंदोलन वाढीव पदांची माहिती अचूक व परिपूर्णरीत्या त्वरित शासनाने गोळा करावी व शासनाने वाढीव पदांना वेतनासह त्वरित मंजुरी द्यावी. या प्रमुख दोन मागण्यांसाठी आंदोलन सुरू करण्यात आले आहे.
050921\1658-img-20210905-wa0010.jpg
फोटो