सेंट पॉल स्कूलमध्ये स्वातंत्रदिन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2021 04:31 AM2021-08-19T04:31:14+5:302021-08-19T04:31:14+5:30

बल्लारपूर : सेंट पॉल स्कूल, बामणी येेथे स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाला संस्थेचे सचिव अविनाश खैरे, संचालिका नीना ...

Independence Day at St. Paul's School | सेंट पॉल स्कूलमध्ये स्वातंत्रदिन

सेंट पॉल स्कूलमध्ये स्वातंत्रदिन

Next

बल्लारपूर : सेंट पॉल स्कूल, बामणी येेथे स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाला संस्थेचे सचिव अविनाश खैरे, संचालिका नीना खैरे, प्रमुख पाहुणे म्हणून हरिष गेडाम, मुख्याध्यापिका मेनका भंडुला, प्रबंधक गीता गुप्ता आदी उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रपिता म. गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, भारत माता यांच्या प्रतिमेसमोर दीप प्रज्वलित करून करण्यात आली. त्यानंतर ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी अविनाश खैरे यांनी विद्यार्थ्यांना स्वातंत्रदिनाचे महत्त्व पटवून दिले. कार्यक्रमाला शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

-----

डॉ. आंबेडकर महाविद्यालय, चंद्रपूर

फोटो

चंद्रपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरिअल सोसायटी, चंद्रपूर संचलित डाॅ. आंबेडकर महाविद्यालय, चंद्रपूर येथे भारतीय स्वातंत्र्याच्या ७५ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त ध्वजारोहण कार्यक्रम पार पडला. संस्थाध्यक्ष अरुण घोटेकर यांच्याहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर बॅरि. राजाभाऊ खोब्रागडे सांस्कृतिक सभागृहात कोरोना योद्धे डॉ. प्रवीण येरमे, डॉ. शारदा येरमे यांचा सत्कार करण्यात आला. तसेच महाविद्यालयाला उत्कृष्ट राष्ट्रीय सेवा योजना पुरस्कार मिळाल्याबद्दल प्राचार्य डॉ. राजेश दहेगावकर, विद्यापीठातर्फे कोरोनायोद्धा पुरस्कार मिळाल्याबद्दल समन्वयक डॉ. विजू गेडाम तसेच डॉ. मिलिंद भगत, प्रा. सतीश पेटकर, डॉ. नितीन घुगरे यांना उत्कृष्ट रासोयोे कार्यक्रम अधिकारी पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला. प्रास्ताविक प्राचार्य डॉ. राजेश दहेगावकर, संचालन डॉ. मिलिंद भगत, प्रा. सतीश पेटकर, तर आभार डॉ. नितीन घुगरे यांनी मानले.

Web Title: Independence Day at St. Paul's School

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.