भारत शैक्षणिकदृष्ट्या प्रगत राष्ट्र होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2017 11:27 PM2017-12-22T23:27:13+5:302017-12-22T23:28:07+5:30

जगात भारताचे कुशल कारागीर कानाकोपºयात पोहोचले आहे. त्यामुळे येत्या काळात भारत इतर देशांच्या तुलनेत शैक्षणिकदृष्ट्या प्रगत राष्ट्र होणार, असे प्रतिपादन केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केले.

India will be an academically advanced nation | भारत शैक्षणिकदृष्ट्या प्रगत राष्ट्र होणार

भारत शैक्षणिकदृष्ट्या प्रगत राष्ट्र होणार

googlenewsNext
ठळक मुद्देहंसराज अहीर : राजुरा येथील सोनिया कॉन्व्हेंटमध्ये विविध कार्यक्रम

आॅनलाईन लोकमत
राजुरा : जगात भारताचे कुशल कारागीर कानाकोपऱ्यात पोहोचले आहे. त्यामुळे येत्या काळात भारत इतर देशांच्या तुलनेत शैक्षणिकदृष्ट्या प्रगत राष्ट्र होणार, असे प्रतिपादन केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केले.
सोनिया गांधी इंग्लिश पब्लिक स्कूल राजुराच्यावतीने आयोजित स्नेह संमेलन कार्यक्रमात उद्घाटक म्हणून ते बोलत होते. ग्रामीण भागातील शैक्षणिक व्यवस्था सक्षम करण्याकरिता शासन सर्व प्रयत्न करीत असून देशात शिक्षणाचे जाळे पसरवून ग्रामीण परिसरातील मुलांना शैक्षणिक प्रवाहात आणण्याचे कार्य सुरू आहे, असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाला आमदार अ‍ॅड. संजय धोटे, आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष माजी आमदार प्रभाकरराव मामुलकर, संस्थेचे जेष्ठ पदाधिकारी दत्तात्रय येगिनवार, सुधाकर कुंदोजवार, अ‍ॅड. मुर्लीधरराव धोटे, बँकेचे संचालक दिलीप नलगे, माजी जिल्हा परिषद सदस्य अविनाश जाधव, शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एस.एम. वरकड, शिवाजी विद्यालयाचे मुख्याध्यापक नामदेव निब्रड, सोनिया गांधी इंग्लिश पब्लिक स्कूलचे प्राचार्य शबनम अन्सारी, कॉन्व्हेंटच्या प्रशक्षिका कृतिका सोनटक्के, राहुल सराफ, राजू घरोटे, भारतीय जनता पक्षाचे शहर अध्यक्ष बादल बेले, आनंद भेंडे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचालन प्रा. बी. यू. बोर्डेवार यांनी केले. प्रास्ताविक अविनाश जाधव यांनी तर आभार डॉ. एस. एम. वरकड यांनी मानले. यावेळी अनेकांची उपस्थिती होती.

Web Title: India will be an academically advanced nation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.