भारतीय जैन संघटना स्वीकारणार अनाथ बालकांच्या शिक्षणाची जबाबदारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2021 04:20 AM2021-07-10T04:20:03+5:302021-07-10T04:20:03+5:30
बाॅक्स जबाबदार नागरिक बनविण्याचे कार्य भारतीय जैन संघटनेने लातूर भूकंपातील १ हजार २०० भूकंपग्रस्त विद्यार्थी, मेळघाट व ठाण्यातील १ ...
बाॅक्स
जबाबदार नागरिक बनविण्याचे कार्य
भारतीय जैन संघटनेने लातूर भूकंपातील १ हजार २०० भूकंपग्रस्त विद्यार्थी, मेळघाट व ठाण्यातील १ हजार १०० आदिवासी विद्यार्थी, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची ७०० मुले असे मागील ३० वर्षांत तीन हजार विद्यार्थ्यांना मानसिक तणावातून बाहेर काढून शैक्षणिक पुनर्वसन पूर्ण करून त्यांना एक कर्तबगार, जबाबदार व संवेदनशील नागरिक बनविण्याचे कार्य केले आहे.
कोट
कोरोना संकटामुळे अनेक बालकांच्या डोक्यावरील छत्र हरपले आहे. त्यामुळे त्यांना आधार देण्यासाठी भारतीय जैन संघटनेने पुढाकार घेतला आहे. जबाबदारी घेण्यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना भेटून निवेदन दिले आहे. जिल्ह्यातील बालकांची नावे गोळा करून त्यांच्या घरी भेट देण्यात येणार आहे.
यापूर्वी संकटाच्या वेळी भारतीय जैन संघटनेने पुढाकार घेत समाजोपयोगी कामे केली आहेत. - अशोक संघवी,
सल्लागार, भारतीय जैन संघटना, महाराष्ट्र राज्य