इंदिरा गांधी जन्मशताब्दी समारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2017 10:45 PM2017-08-21T22:45:19+5:302017-08-21T22:45:41+5:30

जिल्हा शहर काँग्रेस कमिटी व चंद्रपूर जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटी यांच्या संयुक्त विद्यमानाने भारतरत्न इंदिरा गांधी यांची शताब्दी समारंभ ....

Indira Gandhi Birth Centenary Celebrations | इंदिरा गांधी जन्मशताब्दी समारंभ

इंदिरा गांधी जन्मशताब्दी समारंभ

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : जिल्हा शहर काँग्रेस कमिटी व चंद्रपूर जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटी यांच्या संयुक्त विद्यमानाने भारतरत्न इंदिरा गांधी यांची शताब्दी समारंभ शनिवारी स्थानिक मातोश्री मंगल कार्यालय तुकूम येथे विविध कार्यक्रमांनी पार पडला.
अध्यक्षस्थानी आ. विजय वडेट्टीवार तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी आ. देवराव भांडेकर, माजी जिल्हाध्यक्ष विनायक बांगडे, माजी जिल्हाध्यक्ष सुभाषसिंह गौर, महिला काँग्रेस सल्लागार डॉ. रजनी हजारे, चंद्रपूर जिल्हा शहर काँग्रेस अध्यक्ष नंदू नागरकर, ग्रामीण जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे, लोकसभा अध्यक्ष शिवा राव, जिल्हा परिषद गट नेता डॉ.सतीश वारजूरकर, म.प्र.सचिव डॉ.आसावरी देवतळे, माजी प्रदेश सचिव सुनिता लोढीया, राजुरा नगरपालिका नगराध्यक्ष अरुण धोटे, बल्लारपूर तालुका अध्यक्ष घनश्याम मुलचंदानी, माजी सभापती संतोष लहामगे, सर्व तालुका अध्यक्ष, चंद्रपूर जिल्हा शहर काँग्रेस कमेटीचे पदाधिकारी, प्रा. अनिल शिंदे, संजय रत्नपारखी, अ‍ॅड. मलक शाकीर, जिल्हाध्यक्ष, अल्पसंख्याक विभाग जिल्हाध्यक्ष, महिला जिल्हाध्यक्ष अश्विनी खोब्रागडे, विधानसभा अध्यक्ष सचिन कत्याल, माजी महापौर संगीता अमृतकर, घनश्याम येनुरकर, राजू सिद्दाम, दादा पाटील लांडे, नगरसेवक अमजद अली, शालिनी भगत, बंडोपंत तातावार, मंगला मडावी, युसुफ भाई, फारुक सिद्धीकी, हाजी हारुण, महिला शहर अध्यक्ष अनिता कथडे, प्रियंका वानखेडे यांच्यासह अन्य पदाधिकारी आदी मंचावर उपस्थित होते.
यावेळी जिल्हा काँग्रेस सेवादलाचे जेष्ठ पदाधिकारी व कार्यकर्ते यांचे आ. वडेट्टीवार यांनी शाल, श्रीफळ देवून सत्कार केला. यावेळी स्वातंत्र्य सैनिक बाबुरावजी वनकर, गिरजाजी बैस, अशोक आक्केवार, प्रेमिलाताई बोरकुटे, निर्मला ठाकुर, रेखा शेंभेकर, डॉ. रजनी हजारे, दादा पाटील लांडे, दिलीप माकोडे, जीवन कृष्ण डे, जोगेश सोनडुले, गंगाधर गुरुनुले अशा ३० सेवादल पदाधिकारी व कार्यकर्ते यांचा सत्कार याप्रसंगी करण्यात आला.
त्यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष विजय वडेट्टीवार यांना राज्यमंत्री दर्जा (प्रतोद) पावसाळी अधिवेशनात मुंबई येथे निवड झाल्याबद्दल यांचा सत्कार चंद्रपूर जिल्हा शहर काँग्रेस अध्यक्ष नंदू नागरकर व ग्रामीण जिल्हा अध्यक्ष प्रकाश देवतळे, यांनी शाल, श्रीफळ, स्मृतीचिन्ह व पुष्पगुच्छ देवून गौरव करण्यात आला.
त्यानंतर आ. विजय वडेट्टीवार यांनी स्व. भारतरत्न इंदिरा गांधी यांच्या जन्मशताब्दी समारोहप्रसंगी जीवनावर माहिती देवून समारोहामध्ये मार्गदर्शन केले. यावेळी यांनी भारतीय जनता पार्टी सरकारवर कडाडून टिका केली.
त्यांनतर प्रमुख पाहुण्यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन नंदू नागरकर यांनी केले. प्रास्ताविक प्रकाश देवतळे यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राजू दास, गौतम चिकाटे, शालिनी भगत, निखील धनवलकर, राजा काझी, सुरेश खापने, हरिदास लांडे, अरविंद मडावी, सर्व तालुका अध्यक्ष माधव बिरजे (चिमूर), प्रफुुल खापर्डे (नागभीड), खेमराज तिडके (ब्रह्मपुरी) विरेंद्र जयस्वाल (सिंदेवाही), घनश्याम येनुरकर (मूल), श्रीकांत ढोंगे (भद्रावती), साहेबराव ठाकरे (वरोरा), विठ्ठलराव थिपे (कोरपना), गणपत आडे(जिवती), ओमेश्वर पद्मगिरीवार, तुकाराम झाडे (गोंडपिपरी), तसेच काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी प्रयत्न केले.

Web Title: Indira Gandhi Birth Centenary Celebrations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.