वाढोणा ग्रा.पं.ची शिशू किट योजना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2021 04:30 AM2021-08-23T04:30:08+5:302021-08-23T04:30:08+5:30
जन्माला आलेल्या शिशूला व त्याच्या आईला सर्व वस्तू उपलब्ध व्हाव्यात व त्याचे आरोग्य सुदृढ राहावे हा हेतू डोळ्यासमोर ...
जन्माला आलेल्या शिशूला व त्याच्या आईला सर्व वस्तू उपलब्ध व्हाव्यात व त्याचे आरोग्य सुदृढ राहावे हा हेतू डोळ्यासमोर ठेवून ग्रामपंचायत वाढोणाचे सरपंच देवेंद्र गेडाम यांनी ग्रा.पं. कमिटीसमोर हा विषय ठेवला. त्यास सर्वांनी सहमती दर्शवली. या किटमध्ये नवजात शिशूसाठी बेबी सोप, बेबी पावडर, तेल, मच्छरदानी, चादर, नॅपकिन, ड्रेस, टावेल तर बाळाच्या आईसाठी टॉनिक बॉटल, सॅनिटरी पॅड व इतर वस्तू आहेत. ग्रामपंचायत वाढोणा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये जन्म व ग्राम पंचायत वाढोणा येथे जन्माची नोंद होणाऱ्या प्रत्येक शिशू व त्याच्या आईला सदर योजनेचा लाभ मिळणार आहे.
योजना शुभारंभप्रसंगी तहसीलदार मनोहर चव्हाण, पं.स. सदस्य श्यामसुंदर पूरकाम, सरपंच देवेंद्र गेडाम, बाल विकास प्रकल्प अधिकारी राजेंद्र ठोंबरे, तालुका वैद्यकीय अधिकारी विनोद मडावी, उपसरपंच भगवान बोरकर आदी उपस्थित होते. या वेळी काही लाभार्थ्यांना प्रमुख अतिथींच्या हस्ते किटचे वाटप करण्यात आले. यात निशा विभाकर उईके, योगिता भोजराज गायकवाड, रेखा विकास बोरकर यांचा समावेश आहे.
220821\img-20210822-wa0032.jpg
शिशू किट शुभारंभप्रसंगी उपस्थित मान्यवर