फुलांची आवक वाढली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2021 04:32 AM2021-09-12T04:32:07+5:302021-09-12T04:32:07+5:30
शहरात नांदेड, जालना, हैदराबाद यासह ग्रामीण भागातून शेतकऱ्यांनी लागवड केलेली फुले बाजारात विक्रीसाठी येतात. यात पिवळा झेंडू तसेच शेवंती ...
शहरात नांदेड, जालना, हैदराबाद यासह ग्रामीण भागातून शेतकऱ्यांनी लागवड केलेली फुले बाजारात विक्रीसाठी येतात. यात पिवळा झेंडू तसेच शेवंती यांच्या हाराचे दर १५० रुपये एवढे झाले होते. गणेश चतुर्थीच्या दिवशी गुलाबाचे एक फूल दहा रुपये दराने विक्री होत होते. यासह मोगऱ्याची फुले, गजरा याचेही दर वाढले होते. एरवी १५ रुपयांना मिळणारा गजरा २० रुपये दराने विक्री होत होता. साधे हार १० ते २० रुपयांऐवजी ३० रुपये विक्री सुरु आहे.
-----
धान खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणी
चंद्रपूर : पणन हंगाम २०२१-२२ मधील आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत धान खरेदी करण्याकरिता पूर्वतयारी म्हणून धान खरेदी करण्याकरिता शेतकऱ्यांनी ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करावी, नोंदणी करण्याचा कालावधी ३ ते ३० सप्टेंबर २०२१ पर्यंत निर्धारित करण्यात आला आहे. त्यानुसार या हंगामातील धान खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांनी ३० सप्टेंबर अखेर आपल्या नजीकच्या धान खरेदी केंद्रावर जाऊन ऑनलाईन नोंदणी करावी. नोंदणी करण्यासाठी आपले आधार कार्ड, मतदान ओळखपत्र, शेतीचा सातबारा, बँक खाते पासबुक आदी संपूर्ण कागदपत्रे आवश्यक आहे, असे आवाहन जिल्हा मार्केटिंग अधिकारी अनिल गोगीरवार यांनी केले आहे.
------
सबलीकरण, स्वाभिमान योजना
चंद्रपूर : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प चंद्रपूर कार्यालयांतर्गत तसेच केंद्रीय क्षेत्र व राज्य क्षेत्र योजनेंतर्गत आदिवासी, आदिम जमातीच्या विकासाकरिता भूमिहीन दारिद्र्य रेषेखालील आदिवासींचे सबलीकरण व स्वाभिमान योजनेंतर्गत जिरायती व बागायती जमीन विक्री करणाऱ्या आदिवासी व इतर जमीन मालकांकडून जमीन विक्रीबाबतचे प्रस्ताव मागविण्यात येत आहेत.