बोगस डॉक्टरांची माहिती द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2018 10:25 PM2018-12-02T22:25:51+5:302018-12-02T22:26:10+5:30

जिल्ह्यातील बोगस डॉक्टरांवर कारवाई करण्यासाठी प्रशासन आपल्या स्तरावर प्रयत्न करीत आहे. मात्र लोकांच्या जीवाशी खेळणाऱ्या बोगस डॉक्टरांचा पर्दाफाश करण्याचे काम जागरुक नागरिक करू शकतात. त्यांनी स्थानिक स्तरावरील यंत्रणांकडे याबाबतची माहिती द्यावी. या जिल्ह्यामध्ये एकही बोगस डॉक्टर लोकांच्या जीविताशी खेळता कामा नये, असा इशारा जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी दिला आहे.

Information about bogus doctors | बोगस डॉक्टरांची माहिती द्या

बोगस डॉक्टरांची माहिती द्या

Next
ठळक मुद्देकुणाल खेमणार : आरोग्य यंत्रणेने तपास मोहीम राबवण्याचे निर्देश

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : जिल्ह्यातील बोगस डॉक्टरांवर कारवाई करण्यासाठी प्रशासन आपल्या स्तरावर प्रयत्न करीत आहे. मात्र लोकांच्या जीवाशी खेळणाऱ्या बोगस डॉक्टरांचा पर्दाफाश करण्याचे काम जागरुक नागरिक करू शकतात. त्यांनी स्थानिक स्तरावरील यंत्रणांकडे याबाबतची माहिती द्यावी. या जिल्ह्यामध्ये एकही बोगस डॉक्टर लोकांच्या जीविताशी खेळता कामा नये, असा इशारा जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी दिला आहे.
शुक्रवारी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली बोगस डॉक्टर शोध व कार्यवाही समितीची बैठक घेण्यात आली. बैठकीला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. एस. एस. मोरे, जिल्हा परिषदचे अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे, महानगरपालिकेचे अतिरीक्त आयुक्त भालचंद्र बेहरे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रकाश साठे, मनपाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. अंजली आंबटकर, तालुका वैद्यकीय अधिकारी आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी खेमनार पुढे म्हणाले, जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात बोगस डॉक्टर असल्याच्या तक्रारी ग्रामीण भागातून येत आहेत. या डॉक्टरांमुळे नागरिकांचे जीवत्व धोक्यात येत आहे. त्यामुळे यावर आळा घालण्यासाठी आरोग्य विभागाने अधिक सक्षमपणे काम करण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ग्रामीण भागातील नागरिक, पोलीस पाटील, ग्रामसेवक, सरपंच, तलाठी यांच्याकडून वेळोवेळी माहिती घेवून बोगस डॉक्टरांवर धाडी टाकण्यात येवून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावेत, अशा सूचना संबंधीत यंत्रणेला त्यांनी दिल्या. विना परवानगीने चालविण्यात येणाºया नर्सिग होमची माहिती घेण्यात यावी, आणि अशा नर्सिग होमला शेवटची नोटीस देवून त्यांच्या नर्सिग होम तात्काळ बंद करण्याची कार्यवाही करण्यात यावी, असेही त्यांनी सांगितले. तक्रार आल्यास त्याची चौकशी पूर्ण झालीच पाहीजे, अशी ताकीदही त्यांनी दिली.

Web Title: Information about bogus doctors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.