महिलांनी घेतली आधुनिक शेती तंत्रज्ञानाची माहिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2017 12:35 AM2017-10-07T00:35:03+5:302017-10-07T00:35:13+5:30
राष्टÑीय ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत राजुरा महिला किसान सबलीकरण योजनेच्या माध्यमातून तालुका अभियान कक्ष राजुरातर्फे ग्रामीण भागातील कृषी क्षेत्राशी निगडीत महिलांचा अभ्यास दौरा.....
लोकमत न्यूज नेटवर्क
राजुरा : राष्टÑीय ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत राजुरा महिला किसान सबलीकरण योजनेच्या माध्यमातून तालुका अभियान कक्ष राजुरातर्फे ग्रामीण भागातील कृषी क्षेत्राशी निगडीत महिलांचा अभ्यास दौरा चनाखा येथील एक मोकळा श्वास कृषी पर्यटन केंद्रात नेण्यात आला. या ठिकाणी आधुनिक शेती व शेतीपूरक व्यवसायाबाबतच्या महिलांना मार्गदर्शन करण्यात आले.
ग्रामीण भागातील दारिद्र्य निर्मुलनासाठी केंद्र शासनाने राष्टÑीय ग्रामीण जीवनोन्नती अभियानाची सुरुवात केली आहे. गरीब गरीबीतून बाहेर पडू शकतो त्यास आवश्यक सहाय्य दिले पाहिजे. या विश्वासातून गरीबांसाठी संस्था निर्माण करुन त्या माध्यमातून ग्रामीण भागातील गरीबांच्या कौटुंबिक उत्पन्नात वाढ होण्याच्या दृष्टीने कुशल आणि प्रभावी व्यासपीठ देण्यात येते. गरीबांचे सबलीकरण करण्यासाठी त्यांचे हक्क, न्याय, सार्वजनिक व सामाजिक सेवा त्यांच्यापर्यंत पोहचविणे हा अभियानाचा उद्देश आहे.
या अभियानाअंतर्गत राजुरा महिला किसान सबलिकरण योजनेच्या माध्यमातून तालुक्यातील १० कृषी सखी व १० महिला बचत गटातील ५० महिलांच्या एका चमूचा अभ्यास दौरा पार पडला. चनाखा या कृषी पर्यटन केंद्रास भेट देऊन तेथे करण्यात येणारी आधुनिक शेती, शेतीतील पुरक व्यवसाय, सोबतच नव-नवीन तंत्रज्ञान, शेती पिकांसोबतच फळे, फुले, भाजीपाला व इतर माध्यमातून कशा प्रकारे उत्पन्नात वाढ करता येईल, याची माहिती महिलांनी देण्यात आली.
याप्रसंगी राष्टÑीय ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या राजुरा तालुका व्यवस्थापक संतोषी उमक, तालुका व्यवस्थापक नरेंद्र नगराळे, एक मोकळा श्वास कृषी पर्यटन केंद्राचे संचालक सुहास आसेकर, रिंकू मरस्कोले व विविध बचत गटाच्या महिला, कृषी सखी उपस्थित होत्या.