पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी जेसीआय, गरीमा व रेनायसन्सचा पुढाकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2021 04:33 AM2021-09-14T04:33:35+5:302021-09-14T04:33:35+5:30
चंद्रपूर : जेसीआय चंद्रपूर, गरीमा व एनएम पुगलिया ट्रस्ट संचालित रेनायसन्स ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन यांनी स्वच्छ व सुंदर पर्यावरण ...
चंद्रपूर : जेसीआय चंद्रपूर, गरीमा व एनएम पुगलिया ट्रस्ट संचालित रेनायसन्स ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन यांनी स्वच्छ व सुंदर पर्यावरण या संकल्पनेवर यंदाच्या गणेशोत्सवात फिटकरीपासून बनलेल्या मूर्तीची स्थापना लोकांनी करावी, यासाठी जनजागृती मोहीम राबवली आहे. या संकल्पनेला चांगला प्रतिसाद मिळाला असून, अनेकांनी फिटकरीपासून बनलेल्या मूर्तीची स्थापना केली आहे.
उद्घाटन जेसीआय इंडिया झोनचे १३ प्रेसिडेंट जेसी अनुप गांधी, रेनायसन्स ग्रुपचे संचालक डॉ. जी. एफ. सूर्या यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जेसीआय गरीमाच्या अध्यक्ष डॉ. रुजुता मुंधडा, शीतल लोहिया, एकता लोढा, रोशनी पुगलिया, ज्युनियर जेसी विंगचे अध्यक्ष प्रथम पुगलिया उपस्थित होते.
यावेळी अनुप गांधी म्हणाले, पर्यावरणाची हानी होऊ नये, यासाठी शासनस्तरावर प्रयत्न केले जात आहेत. याच संकल्पनेतून संस्थेने फिटकरीपासून बनवलेल्या मूर्तीची स्थापना केली आहे. फिटकरीपासून बनवलेल्या मूर्तीचे विसर्जन केल्याने पाणीच्या शुद्धीकरणास मदत होऊन मूर्तीची विटंबना होणार नाही.