कोरोनामुक्त गावासाठी कळमना ग्रामपंचायतीचा पुढाकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2021 04:20 AM2021-06-18T04:20:05+5:302021-06-18T04:20:05+5:30
बल्लारपूर : राज्य शासनाच्या ग्राम विकास विभागाने जून महिन्यात कोरोनामुक्त गाव ही योजना सुरु करण्यात आली आहे. आपले गाव ...
बल्लारपूर : राज्य शासनाच्या ग्राम विकास विभागाने जून महिन्यात कोरोनामुक्त गाव ही योजना सुरु करण्यात आली आहे. आपले गाव कोरोनामुक्त करून आरोग्यदायी जीवनाच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी १ हजार ३४६ लोकसंख्या असलेल्या कळमना ग्रामपंचायतीने पुढाकार घेतला आहे.
गावात निर्जंतुकीकरण फवारणी करणे सुरु केले आहे.
राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त निर्मल ग्राम कळमना येथे कोरोनाला हद्दपार करण्यासाठी ग्रामपंचायतच्या सरपंच सरला परेकर, उपसरपंच रमेश पोडे, ग्रामपंचायत सचिव विकास तेलमासरे, शामसुंदर झाडे, दौलत शेडमाके, संघर्ष रेनकुंटलावार, सविता नेवारे, कल्पना देशमुख,वैशाली जेणेकर, छाया तलांडे,पोलीस पाटील बेबीनंदा उमरे यांच्या उपस्थितीत गावातील तिन्ही प्रभागात निर्जंतुकीकरण फवारणी करून कोरोना मुक्तीसाठी जनजागृती करण्यात आली.