अंगणवाडी सेविकांवर अन्याय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2018 11:03 PM2018-03-25T23:03:09+5:302018-03-25T23:03:09+5:30
अंगणवाडी सेविकांचे सेवानिवृत्तीचे वय ६५ वर्षांवरुन ६० वर्षे करण्णयात आले आहे. त्यामुळे १ एप्रिलला १५ हजारांहून जास्त अंगणवाडी सेविका सेवानिवृत्त होणार आहे.
आॅनलाईन लोकमत
मूल : अंगणवाडी सेविकांचे सेवानिवृत्तीचे वय ६५ वर्षांवरुन ६० वर्षे करण्णयात आले आहे. त्यामुळे १ एप्रिलला १५ हजारांहून जास्त अंगणवाडी सेविका सेवानिवृत्त होणार आहे. या निर्णयामुळे अंगणवाडी सेविकांवर अन्याय करण्यात आला आहे. त्यामुळे हा निर्णय मागे घेण्यात यावा, असे प्रतिपादन प्रा. रमेशचंद्र दहिवडे यांनी केली.
अंगणवाडी सेविकांचा मेळावा मूल येथे नुकताच पार पडला. यावेळी ते बोलत होते. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी वैशाली बोकारे उपस्थित होत्या. प्रास्ताविक भाषणात प्रमिला गोडे म्हणाल्या, नियुक्तीच्या आदेशात सेवानिवृत्तीचे वय ६५ राहील, असे स्पष्टपणे लिहिले असताना वयोमर्यादा कमी करून ती ६० वर्षे करणे हे चुकीचे आहे. हा अन्याय आम्ही खपवून घेणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. प्रा. दहिवडे म्हणाले २६ जून १९७५ ला रात्री १२ वाजता आणिबाणी घोषित केली. त्यावेळी जे पांघरून घेवून झोपलेले होते त्यांना घरून उचलून आणण्यात आले. अशा लोकांना स्वातंत्र्यसैनिकांचा दर्जा आणि १२ हजार रुपये मासिक पेंशन देण्याच्या हालचाली सुरू आहे. हा खऱ्या स्वातंत्र्य सैनिकांचा घोर अपमान आहे. इंग्रज सरकारच्या विरोधात गुलामगिरी दूर करण्यासाठी स्वातंत्र्य मिळविण्यासाठी जे लढले तेच आहे खरे स्वातंत्र्य सैनिक, अंगणवाडी सेविकांकरिता निधी नसतो, मात्र अशा लोकांवर खर्च करण्यासाठी पैसा कुठून येतो, असा सवालही प्रा.दहिवडे यांनी केला. यावेळी वर्षा पाल, विजया महावादीवार, सिंधू कावळे, माया कोहपरे, छब बनकर उपस्थित होते.