नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांवर अन्याय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2021 04:31 AM2021-09-12T04:31:49+5:302021-09-12T04:31:49+5:30
आशिष खाडे पळसगाव : राज्य सरकारने नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना महात्मा फुले कर्जमाफी योजनेंतर्गत सानुग्रह अनुदान देण्याची घोषणा ...
आशिष खाडे
पळसगाव : राज्य सरकारने नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना महात्मा फुले कर्जमाफी योजनेंतर्गत सानुग्रह अनुदान देण्याची घोषणा केली. ज्या शेतकऱ्यांनी मागील तीन वर्षांपासून नियमितपणे कर्जाची उचल करून त्याची परतफेड केली, अशा शेतकऱ्यांच्या खात्यात ५० हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्यात येईल, अशी घोषणा राज्य सरकारने केली होती. परंतु आजतागायत अजूनही शेतकऱ्यांना ती रक्कम मिळालेली नाही. त्यामुळे नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांवर शासनाने अन्याय केला आहे.
बल्लारपूर तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी व्याजाने पैसे घेऊन दिलेल्या वेळेत कर्जाचा भरणा करून उचललेल्या कर्जाची परतफेड करीत होते. त्या कर्जाची परतफेड करण्यासाठी आपल्या घरातील किमती वस्तू, काही शेतकऱ्यांनी जनावरे विकून कर्जाचा भरणा केला. ५० हजार रुपये प्रोत्साहनपर रक्कम देण्यास महाविकास आघाडी अनेक कारणामुळे विलंब करीत आहे. नियमित कर्जाचा भरणा करणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये शासनाविषयी रोष तयार झाला आहे.
कोट
आम्ही शेतकरी दरवर्षी कर्जाची परतफेड न चुकता करतो. परंतु शासनाने आम्हाला खोटे आश्वासन देऊन आम्हा शेतकऱ्यांची दिशाभूल केली आहे.
- मनीषा पुंडलिक उपरे
नियमित कर्जदार शेतकरी, पळसगाव