आरोग्य अभियान पदभरतीत ओबीसीवर अन्याय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2020 05:00 AM2020-06-26T05:00:00+5:302020-06-26T05:00:37+5:30

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी चंद्र्रपूरने ४८ पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध केली. यामध्ये ओबीसी उमेदवारांना एकही जागा कोणत्याही पदासाठी राखीव नाही. उलट मराठा व इडब्ल्यूएससाठी जागा राखीव आहेत. जिल्ह्यात ओबीसीला १९ टक्के आरक्षण असताना ओबीसी विद्यार्थ्यांवर अन्याय झाला आहे.

Injustice on OBCs in health campaign recruitment | आरोग्य अभियान पदभरतीत ओबीसीवर अन्याय

आरोग्य अभियान पदभरतीत ओबीसीवर अन्याय

Next
ठळक मुद्देएकही जागा राखीव नाही : राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे पालकमंत्र्यांना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत आरोग्य विभागाने काढलेल्या ४८ पदांच्या कंत्राटी मनुष्यबळ जाहिरातीमध्ये ओबीसीसाठी एकही जागा राखीव नाही. बिंदू नामावलीचा शासन आदेश रद्द केल्यानंतरही ओबीसी विद्यार्थ्यांना डालवून नोकर भरती प्रक्रिया सुरू असल्याने अन्याय झाला. त्यामुळे हा अन्याय दूर करण्याची मागणी राष्ट्रीय ओबीसी महासंघाने मागास बहुजन कल्याण मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्याकडे निवेदनातून केली आहे.
राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी चंद्र्रपूरने ४८ पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध केली. यामध्ये ओबीसी उमेदवारांना एकही जागा कोणत्याही पदासाठी राखीव नाही. उलट मराठा व इडब्ल्यूएससाठी जागा राखीव आहेत. जिल्ह्यात ओबीसीला १९ टक्के आरक्षण असताना ओबीसी विद्यार्थ्यांवर अन्याय झाला आहे. सामान्य प्रशासनाच्या परिपत्रकानुसार १६ ऑगस्ट २०१९ व २१ ऑगस्ट २०१९ चे बिंदूनावलीचे दोन्ही परिपत्रक, शासनाने हे बिंदूनामलीचे प्रतिपत्रक २२ ऑगस्ट २०१९ परिपत्रक काढून रद्द केले आहेत. त्यानंतर सुधारित बिंदूनामावली परिपत्रक निघाले नाही. त्यामुळे कोणत्या आधारावर आरोग्य विभागाने आरक्षण ठरविले, असा प्रश्न महासंघाचे सरचिटणीस सचिन राजुरकर यांनी निवेदनातून उपस्थित केला आहे.

Web Title: Injustice on OBCs in health campaign recruitment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.