समाजकार्य शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांवर अन्याय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2021 04:20 AM2021-06-24T04:20:04+5:302021-06-24T04:20:04+5:30
विसापूर : मास्टर ऑफ सोशल वर्क ( एम.एस.डब्लू.)अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या राखीव असलेल्या पदांची मर्यादा शासनाने कमी केल्याने समाजकल्याण ...
विसापूर : मास्टर ऑफ सोशल वर्क ( एम.एस.डब्लू.)अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या राखीव असलेल्या पदांची मर्यादा शासनाने कमी केल्याने समाजकल्याण अधिकारी, संशोधन अधिकारी, गृहपाल, उद्योग, ऊर्जा, कामगार आयुक्त, सरकारी कामगार अधिकारी या प्रकारच्या पदांसाठीच्या पात्रतेमध्ये बदल करण्यात आला आहे. हा बदल रद्द करून समाजकार्य शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांवरचा अन्याय दूर करून पदांची संख्या वाढवावी, अशी मागणी समाजकार्य बाचव कृती समिती चंद्रपूरने शासनाकडे केली आहे.
गेल्या काही वर्षांत संबंधित पदांच्या पात्रतेत बदल करण्यात येत असल्याने या संधी मर्यादित झाल्या आणि बेरोजगारीचे प्रमाण वाढत गेल्याने पदवी-पदव्युत्तर विद्यार्थ्यांचे मोठे हाल झालेले आहेत. याबाबत समाजकार्य शिक्षण बचाव कृती समितीने जिल्हाधिकारी, जिल्हा समाजकल्याण अधिकारी यांना निवेदन देऊन व्यथा मांडल्या.
समाजकल्याण अधिकारी पदासाठीच्या पात्रतेचे निकष ४ मार्च १९८० रोजी निश्चित करण्यात आले आहे, परंतु यात २०१७-१८ पासून सेवाप्रवेश नियमात सातत्याने बदल केले जात आहे. या पदांची कार्य जबाबदाऱ्या या अनुसूचित जाती, भटक्या जमाती, दुर्बल घटक, महिला, बालक, वृद्ध, अनाथ व वंचित घटकांसाठी राबविण्यात येणाऱ्या कल्याणकारी योजनांचा संबंधित आहेत. या सर्व विषयांचा अभ्यास समाजकार्य स्नातकोत्तर पदवी-पदव्युत्तर अभ्यासक्रमात अंतर्भाव आहे. ज्यांनी एम.एस. डब्लू.पदव्युत्तर शिक्षण घेऊन प्रत्यक्ष तयारी करून संबंधित क्षेत्रात काम केलेले आहे. अशा पदवी-पदव्युत्तर प्राप्त उमेदवार या पदावर नियुक्त होणार नसतील तर या अभ्यासक्रमाचे महत्त्व काय, असा प्रश्न एम.एस.डब्लू अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या विद्यार्थी करत आहेत. असून संपूर्ण पदांच्या सेवाप्रवेश नियमांमध्ये बदल करण्यात आले आहेत. हे बदल करण्यात येऊ नयेत व झालेले बदल रद्द करावेत. अशी मागणी समाजकार्य बचाव कृती समिती चंद्रपूरचे सदस्य अक्षय देशमुख, अक्षय लांजेवार, संतोषी डोनीवर, अमोल मोरे, गोपाल पोर्लावार ई. पात्रताधारक समाजकार्य पदवी-पदव्युत्तर शिक्षणप्राप्त बेरोजगारांनी निवेदनातून केली आहे.