मोफत रुग्ण बससेवा रुग्णांसाठी नवसंजीवनी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2018 01:13 AM2018-10-24T01:13:33+5:302018-10-24T01:13:54+5:30
आचार्य विनोबा भावे वैद्यकीय महाविद्यालय तथा रूग्णालय, सावंगी (मेघे) जि. वर्धाकडून भद्रावती येथुन मोफत रूग्ण बससेवा सुरु करण्यात आली आहे. ही बस आठवड्यातून दोन दिवस मंगळवार व गुरूवारी भद्रावती येथील नागमंदिर परिसरातून उपलब्ध राहणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : आचार्य विनोबा भावे वैद्यकीय महाविद्यालय तथा रूग्णालय, सावंगी (मेघे) जि. वर्धाकडून भद्रावती येथुन मोफत रूग्ण बससेवा सुरु करण्यात आली आहे. ही बस आठवड्यातून दोन दिवस मंगळवार व गुरूवारी भद्रावती येथील नागमंदिर परिसरातून उपलब्ध राहणार आहे. या बसचे लोकापर्ण केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांच्या हस्ते करण्यात आले. ही बससेवा भद्रावती व वरोरा परिसरातील नागरिकांना नवसंजिवनी ठरणार आहे, असे प्रतिपादन केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केले.
गरजु रूग्णांना स्वस्त दरात उपचार व रूग्णसेवा मिळावी, या उद्देशाने ही बस सुरु करण्यात आली. लोकापर्ण सोहळ्याप्रसंगी आ.वि.भा.वै.म. सावंगी (मेघे) चे मुख्य कार्यकारी अधिकार उदय मेघे, तहसीलदार शितोळे, उपविभागीय पोलीस अधिकारी पवार, भाजपा नेते विजय राऊत, चंद्रकांत गुंडावार, भाजपा नेते तथा नगरसेवक राजेश मुन, जिल्हा महामंत्री राहुल सराफ, भाजपा दलित आघाडी जिल्हाध्यक्ष विजय वानखेडे, तालुका महामंत्री नरेंद्र जिवतोडे, माजी नगराध्यक्ष सुनिल नामोजवार, नगरसेवक प्रशांत डाखरे, नगरसेविका जयश्री दातारकर, लता ढुमणे, शहर अध्यक्ष प्रवीण सातपुते, शहर महामंत्री किशोर गोवारदीपे आदी उपस्थित होते.
ही बससेवा माजी खासदार दत्ताची मेघे यांच्या सेवाभावी वृत्तीमुळे शक्य झाल्याचे ना. अहीर म्हणाले.