आदिवासी विभागाच्या योजनांची चौकशी सुरू

By admin | Published: June 19, 2016 12:35 AM2016-06-19T00:35:12+5:302016-06-19T00:35:12+5:30

आदिवासी विकास विभागाच्या योजना मंजूर होऊनही लाभार्थ्यांना लाभ मिळाला नाही, अशा तक्रारी प्राप्त झाल्या होत्या.

Inquiries of tribal department schemes started | आदिवासी विभागाच्या योजनांची चौकशी सुरू

आदिवासी विभागाच्या योजनांची चौकशी सुरू

Next

चंद्रपूर : आदिवासी विकास विभागाच्या योजना मंजूर होऊनही लाभार्थ्यांना लाभ मिळाला नाही, अशा तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. या तक्रारींची चौकशी करण्यासाठी राज्य शासनाने निवृत्त न्यायमूर्ती एम. जी. गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती गठित केली. ही चार सदस्यीय समिती गेल्या दोन दिवसांपासून चंद्रपूर जिल्ह्यात आहे. मात्र, गेल्या दोन दिवसांत एकही लाभार्थी या समितीपर्यंत तक्रार घेऊन पोहोचला नाही. त्यामुळे या समितीकडून केवळ एकात्मीक आदिवासी विभाग कार्यालयाच्या कागदपत्रांचीच तपासणी सुरू असल्याचे दिसून आले.

लाभार्थ्यांपर्यंत पोहोचणे आवश्यक
आदिवासी योजनांचा लाभ घेणारे जास्त लाभार्थी हे ग्रामीण भागातील आहेत. मात्र सद्यस्थितीत खरीप हंगामाला सुरूवात झाली आहे. त्यामुळे कामे सोडून तक्रार करण्यासाठी समितीसमोर चंद्रपुरात उपस्थित राहणे अनेकांना शक्य नाही. यासाठी आर्थिक अडचणीचाही सामना करावा लागतो. ज्या गावातील लाभार्थ्यांना लाभ मिळाला नाही, त्या त्या गावात पोहोचून त्याचे म्हणणे ऐकून घेणे आवश्यक आहे.
दस्तऐवजच्या माध्यमातून आदिवासी विभागाच्या योजनांची चौकशी सुरू आहे. प्रकल्प कार्यालयात जागेची अडचण निर्माण झाल्याने स्थळ बदलविण्यात आले. मात्र तक्रारकर्त्यांना पोहोचविण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. दोन दिवसांत एकही लाभार्थी तक्रार घेऊन आलेला नाही. मात्र आणखी दोन दिवस चौकशी सुरू राहणार असून लाभ न मिळालेल्या लाभार्थ्यांनी तक्रार घेऊन उपस्थित राहावे.
- सुनील भोसले
चौकशी समिती सदस्य.

Web Title: Inquiries of tribal department schemes started

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.