ताडोबात विनातिकीट सफारी करणारे रॅकेट जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2020 03:32 PM2020-12-02T15:32:26+5:302020-12-02T15:32:48+5:30

ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात पर्यटकांना विनातिकीट सफारी करविणाऱ्या दोघांविरुद्ध चिमूर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Insect safari racket seized in Tadoba | ताडोबात विनातिकीट सफारी करणारे रॅकेट जेरबंद

ताडोबात विनातिकीट सफारी करणारे रॅकेट जेरबंद

googlenewsNext


लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर: ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात पर्यटकांना विनातिकीट सफारी करविणाऱ्या दोघांविरुद्ध चिमूर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात वनरक्षकासह एका एजंटचा समावेश आहे. पर्यटकांना परवानगी नसताना जास्तीची रक्कम घेऊन ताडोबात व बफर झोनमध्ये हे आरोपी प्रवेश देत होते. आरोपींमध्ये वनरक्षक सोनुने, सचिन कोयचाडे यांचा समावेश आहे. दोघांनाही अटक करण्यात आली आहे. हे दोघेही पर्यटकांकडून फोनवर पैसे घेत होते.
वनअधिकाऱ्यांच्या लक्षात ही बाब आल्यानंतर त्यांनी केलेल्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली.

Web Title: Insect safari racket seized in Tadoba

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.