तापमान मोजल्यानंतरच रेल्वे प्रवासी आत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2021 04:28 AM2021-03-05T04:28:25+5:302021-03-05T04:28:25+5:30
बल्लारशाह रेल्वेस्थानकावर स्वयंचलित तिकीट व तापमान मोजण्याची मशीन बल्लारपूर : कोरोना संसर्ग दुसऱ्या टप्प्यात आल्यामुळे बल्लारशाह रेल्वेस्थानकावर येणाऱ्या व ...
बल्लारशाह रेल्वेस्थानकावर स्वयंचलित तिकीट व तापमान मोजण्याची मशीन
बल्लारपूर : कोरोना संसर्ग दुसऱ्या टप्प्यात आल्यामुळे बल्लारशाह रेल्वेस्थानकावर येणाऱ्या व जाणाऱ्या प्रत्येक प्रवाशांची कसून तपासणी होत आहे. प्रवासी कोविडबाधित तर नाही ना, यासाठी तिकीट व प्रवाशांचे तापमान मोजण्याची ऑटोमॅटिक मशीन रेल्वेस्थानकावर लावण्यात आली आहे.
यासंदर्भात तिकीट निरीक्षक ओमप्रकाश कुमार यांनी सांगितले, अशी मशीन मध्य रेल्वेच्या प्रत्येक झोनमध्ये रेल्वेस्थानकावर लावण्यात आली आहे. या मशीनमध्ये तिकीट निरीक्षकांना प्रवाशांच्या तिकिटाला हात लावण्याची गरज नाही. प्रवासी आपली तिकीट मशीनच्या कॅमेऱ्याला दाखवताच त्याची तपासणी होते. तसेच मशीन प्रवाशांचे तापमानही तपासते. मशीनसमोर हात ठेवल्यानंतर स्कॅन होऊन प्रवाशांचे तापमान स्क्रीनवर येते. ही तपासणी झाल्यानंतरच प्रवाशांना आत सोडण्यात येते. यावेळी टीटीआय एम.एन. बेग व त्यांची तिकीट निरीक्षकांची चमू उपस्थित होती.