आमदारांकडून नियोजित कोविड केअर सेंटर इमारतीची पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2021 04:28 AM2021-05-09T04:28:31+5:302021-05-09T04:28:31+5:30
वरोरा : शहरासोबतच ग्रामीण भागातील कोरोना विषाणूचे रुग्ण वाढत आहे. ग्रामीण भागातच कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार व्हावे, याकरिता वरोरा तालुक्यातील ...
वरोरा : शहरासोबतच ग्रामीण भागातील कोरोना विषाणूचे रुग्ण वाढत आहे. ग्रामीण भागातच कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार व्हावे, याकरिता वरोरा तालुक्यातील ग्रामीण भागात तत्काळ कोविड केअर सेंटर सुरू व्हावे, यासाठी आमदार प्रतिभा धानोरकर यांनी ग्रामीण भागातील इमारतीची अधिकाऱ्यांसोबत पाहणी केली.
वरोरा शहरात मागील काही दिवसांत कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले. यामध्ये कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहे. ग्रामीण भागातील कोरोनाबाधित रुग्णांवर त्याच परिसरात उपचार व्हावे, याकरिता वरोरा तालुक्यातील माढेळी, नागरी, टेमुर्डा, शेगाव येथ कोविड केअर सेंटर सुरू करण्यासाठी आमदार प्रतिभा धानोरकर यांनी आरोग्य केंद्र जिल्हा परिषद शाळा व खासगी शाळेच्या इमारतीची पाहणी केली. या केंद्रामध्ये निवासाची व भोजनाची व्यवस्था केली जाणार असून, एक वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचारी नेमण्यात येणार आहे. शेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीचे काम संथगतीने चालू असल्याचे या पाहणीत आमदार धानोरकर यांना आढळून आले. त्यांनी तत्काळ जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गहलोत यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधून इमारतीचे काम तत्काळ पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. यावेळी उपविभागीय अधिकारी सुभाष शिंदे, तहसीलदार प्रशांत बेडसे, संवर्ग विकास अधिकारी संजय वानखेडे, सहायक पोलीस निरीक्षक सुधीर बोरकुटे, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती राजेंद्र चिकटे, इंदिरा काँग्रेस तालुका अध्यक्ष मिलिंद भोयर, पंचायत समिती सदस्य विजय आत्राम, ग्रामपंचायत सदस्य यशवंत लोंढे, बाजार समिती संचालक चंदू जयस्वाल, गजानन ठाकरे, विलास नरडे आदी उपस्थित होते.