रोहयो समितीकडून पोंभुर्णा तालुक्यातील विकासकामाची पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2021 04:31 AM2021-09-06T04:31:54+5:302021-09-06T04:31:54+5:30

पोंभुर्णा तालुक्यातील आष्टा ग्रामपंचायतीतील सोनापूर व बोर्डा बोरकर अंतर्गत नवीन गंगापूर या गावांना समितीने भेट दिली. या भेटीदरम्यान रोजगार ...

Inspection of development work in Pombhurna taluka by Rohyo Samiti | रोहयो समितीकडून पोंभुर्णा तालुक्यातील विकासकामाची पाहणी

रोहयो समितीकडून पोंभुर्णा तालुक्यातील विकासकामाची पाहणी

Next

पोंभुर्णा तालुक्यातील आष्टा ग्रामपंचायतीतील सोनापूर व बोर्डा बोरकर अंतर्गत नवीन गंगापूर या गावांना समितीने भेट दिली. या भेटीदरम्यान रोजगार हमी योजना समितीच्या सदस्यांनी सोनापूर येथील मामा तलावाच्या पाळीवरील फुलविलेल्या विविध जातीच्या वृक्षाच्या बागेतील ४०० वृक्ष जगविल्याबद्दल स्तुती केली. कामाचे अंदाजपत्रक, आतापर्यंत झालेला खर्च, शिल्लक असलेली रक्कम, मजुरांची संख्या, त्यांना मिळत असलेली रोजी, जॉब कार्ड, मजुरांना मिळत असलेल्या सुविधा याबाबत समितीने संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना विचारणा केली. यावेळी काम करणाऱ्या दोन महिला मजुरासोबत समितीने चर्चा करीत कामाचे स्वरूप जाणून घेतले. या समितीमध्ये तालुक्यात दाखल झालेल्या समितीमध्ये समितीप्रमुख आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांच्यासह राजेश पाटील, नरेंद्र दराडे, अमोल मिटकरी, दादाराव केचे, रामदास आंबटकर, विक्रमसिंह सावंत, शिरीष चौधरी, समीर कुणावार, दिलीप बोरसे, राजेंद्र राठोड आदींचा समावेश होता.

050921\img_20210905_131900.jpg

रोहयो समितीकडून पोंभूर्णा तालुक्यातील विविध विकासकामांना भेट

Web Title: Inspection of development work in Pombhurna taluka by Rohyo Samiti

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.