बल्लारशाह रेल्वे स्थानकावर बाहेरून येणाऱ्यांची तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2020 04:24 AM2020-12-23T04:24:38+5:302020-12-23T04:24:38+5:30
बल्लारपूर : महाराष्ट्र शासनाने गुजरात, राजस्थान, दिल्ली आणि गोवा या चार राज्यातून येणाऱ्या प्रवाशांना रेल्वे स्थानकावर कोरोनाची तपासणी तसेच ...
बल्लारपूर : महाराष्ट्र शासनाने गुजरात, राजस्थान, दिल्ली आणि गोवा या चार राज्यातून येणाऱ्या प्रवाशांना रेल्वे स्थानकावर कोरोनाची तपासणी तसेच चाचणी केल्याचे प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य केले आहे. या पार्श्वभूमीवर बल्लारशाह रेल्वे स्थानकावर येणाऱ्या प्रवाशांची कसून चौकशी करण्यात येत आहे. मागील २५ दिवसात १ हजार १६७ प्रवाशांची तपासणी करण्यात आली.
बल्लारशाह रेल्वे स्थानक हे मध्य रेल्वे झोनचे शेवटचे रेल्वे स्थानक आहे .सध्या कोरोना संकट टळले नाही. केंद्र शासनाने प्रवाशांसाठी ठराविक रेल्वे गाड्या सुरु केल्या आहे. यामुळे बल्लारशाह रेल्वे स्थानकावर ५० टक्के सुपरफास्ट गाड्यांचे अवागमन सुरु आहे. या अनुषंगाने बाहेरून येणाऱ्या रेल्वे प्रवाशांची संख्या कमी आहे. स्थानकावर प्रवाशांच्या चौकशीसाठी रेल्वे प्रशासनाची चमू, नगर परिषदेचे कर्मचारी तसेच आरोग्य विभागाचे कर्मचारी उपस्थित राहून त्यांची चौकशी व नोंदणी करीत आहेत. कोरोनाचे संकट टाळण्यासाठी रेल्वे स्टेशनवर सामाजिक अंतर पाळण्यासाठी पूर्णपणे लक्ष दिल्या जात असून प्रवाशांना माहगर्शनही केल्या जात आहे.
कोट
रेल्वे स्थानकावर बाहेरून येणाऱ्या प्रवाशांची बारकाईने तपासणी केल्या जात आहे. थर्मल स्क्रीनिंग, सॅनिटाईजेशन, मास्कचा वापर करण्याकडे प्रवाशांना सांगण्यात येत आहे. स्थानकावर अशा साहित्याचा स्टॉलही लावण्यात आला आहे.
-विनय दवणे
वरिष्ठ तिकीट निरीक्षक,रेल्वे स्थानक,बल्लारशाह.
फोटो : रेल्वे स्थानकावर बाहेरून आलेल्या प्रवाशांची तपासणी करताना तिकीट निरीक्षकांची चमू .