गुजरात, दिल्ली येथून रेल्वेने येणाऱ्या प्रवाशांची तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2021 04:27 AM2021-05-01T04:27:20+5:302021-05-01T04:27:20+5:30
बल्लारपूर : कोरोनाचा दुसरा टप्पा सुरू झाल्यामुळे व राज्यात संचारबंदीचा माहोल आहे. याचा परिणाम रेल्वे प्रवाशांवर झाल्याचा दिसून येत ...
बल्लारपूर : कोरोनाचा दुसरा टप्पा सुरू झाल्यामुळे व राज्यात संचारबंदीचा माहोल आहे. याचा परिणाम रेल्वे प्रवाशांवर झाल्याचा दिसून येत आहे. रेल्वे प्रशासनाने बल्लारशाह रेल्वेस्थानकावर कडेकोट बंदोबस्त केला असून गुजरात, दिल्ली येथून रेल्वेने येणाऱ्या प्रत्येक प्रवाशाची कसून चौकशी करण्यात येत असून त्यांचा पत्ताही लिहून घेण्यात येत आहे व मास्क न लावलेल्या प्रवाशांना प्रवेश देण्यात येत नाही. यासाठी मुख्य द्वारावर शिक्षक, टीटीआय व सुरक्षा जवानांची चमू बसविण्यात आली आहे.
रेल्वे स्थानकावर प्रत्येक प्रवाशाची चौकशी व नाव पत्ता घेण्यासाठी तहसील कार्यालयाने २४ तास आळीपाळीने राजू वानखेडे, पी.डब्ल्यू.जेनेकर, एस.डी.गौरकार, डी.एल.कुबडे, सुभाष जुनघरे व विजय खोब्रागडे यांची नियुक्ती केली आहे. तर रेल्वे प्रशासनाने टीटीआय व सुरक्षा दलाची नियुक्ती केली आहे. येथे बाहेरून येणाऱ्या प्रत्येक प्रवाशांची कसून चौकशी केली जाते. जे प्रवाशी विना तिकीट येतात त्यांना दंडित करण्यात येते. यामध्ये मास्क न लावलेला यांना प्रवेश नाही तर आरटीपीसीआरची तपासणी न केलेला प्रवासी यांनाही प्रवासाची परवानगी देण्यात येत नाही. यामुळे रेल्वे प्रवाशांची गर्दी ओसरली आहे.