आदिवासी विकास योजनांची तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2018 10:53 PM2018-08-31T22:53:00+5:302018-08-31T22:53:17+5:30

आदिवासीबहुल जिल्ह्यातील विविध आस्थापना योजना, उपाययोजनांमध्ये राज्य शासनाच्या आदेशाप्रमाणे अनुसूचित जमाती कल्याण योजनांची अंमलबजवाणी कशी होते, याची माहिती घेण्यासाठी विधिमंडळाच्या अनुसूचित जमाती कल्याण समितीने शुक्रवारी विविध संस्थांची शुक्रवारी तपासणी केली.

Inspection of tribal development schemes | आदिवासी विकास योजनांची तपासणी

आदिवासी विकास योजनांची तपासणी

Next
ठळक मुद्देअनुसूचित जमाती कल्याण समिती : आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांशी साधला संवाद

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : आदिवासीबहुल जिल्ह्यातील विविध आस्थापना योजना, उपाययोजनांमध्ये राज्य शासनाच्या आदेशाप्रमाणे अनुसूचित जमाती कल्याण योजनांची अंमलबजवाणी कशी होते, याची माहिती घेण्यासाठी विधिमंडळाच्या अनुसूचित जमाती कल्याण समितीने शुक्रवारी विविध संस्थांची शुक्रवारी तपासणी केली.
राज्य शासनाची विशेष अधिकार असणारी १५ विधिमंडळ सदस्यांच्या सहभागातील अनुसूचित जमाती कल्याण समिती सध्या तीन दिवसांच्या जिल्हा दौऱ्यावर आहे. गुरुवारी या चमूने रात्री अकरा वाजेपर्यंत विविध विभागांचा आढावा घेतला. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन व जिल्हा परिषद सभागृहामधील बैठकीत योजनांच्या अंमलबजावणीची माहिती घेतली. आमदार डॉ. अशोक उईके समितीचे अध्यक्ष आहेत. समितीमध्ये आमदार वैभव पिचड, आमदार श्रीकांत देशपांडे, आमदार प्रभुदास भिलावेकर, आमदार डॉ. पंकज भोयर, आमदार राजाभाऊ वाजे, आमदार शांताराम मोरे, आमदार पांडुरंग बरोरा, आमदार आनंद ठाकूर, आमदार पास्कल धनारे, आमदार संतोष टारफे आदींचा समावेश आहे.
शुक्रवारी आमदारांच्या चमुंची तीन भागात विभागणी झाली. समितीप्रमुख आमदार उईके व आमदार पिचड, आमदार देशपांडे आदींनी रात्री उशीरापर्यंत जिल्ह्याच्या विविध भागातील शाळा, ग्रामपंचायती वसतिगृहाची तपासणी केली. आदिवासींच्या हक्काचे संरक्षण होते अथवा नाही, याबाबतची खात्री केली. शुक्रवारी दिवसभर झालेल्या बैठकांमध्ये विभाग प्रमुखांकडून माहिती मागविण्यात आली. तसेच काही विकासकामांबाबत प्रत्यक्षात चौकशी करण्याची तयारी दर्शविली होती. ग्रामपंचायत खडकी येथे भेट घेऊन आदिवासी विकास विभागाच्या विविध योजनांबाबत गावकºयांशी संवाद साधला. यावेळी विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

Web Title: Inspection of tribal development schemes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.