रोहयो समितीकडून चंदनखेड्यात कामाची पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2021 04:31 AM2021-09-05T04:31:33+5:302021-09-05T04:31:33+5:30
महाराष्ट्र विधान मंडळ रोजगार हमी योजना समिती २ सप्टेंबर रोजी जिल्ह्यात दाखल झाली असून, त्या समितीचे सदस्य सांगली विधानसभा ...
महाराष्ट्र विधान मंडळ रोजगार हमी योजना समिती २ सप्टेंबर रोजी जिल्ह्यात दाखल झाली असून, त्या समितीचे सदस्य सांगली विधानसभा क्षेत्राचे आमदार विक्रमसिंह बाळासाहेब सावंत, आर्वी वर्धा विधानसभा क्षेत्राचे आमदार दादाराव यादवराव केचे, नागपूर विधानसभा क्षेत्राचे आमदार रामदास भगवत आंबटकर यांच्याकडून २ सप्टेंबर रोजी सांसद आदर्श ग्राम चंदनखेडा येथील रोजगार हमी योजने अंतर्गत झालेल्या कामाची पाहणी करण्यात आली. त्यात चंदनखेडा येथील विठ्ठल हनवते या शेतकऱ्याच्या शेतातील शेततळ्याची पाहणी करण्यात आली. विशेष म्हणजे या समितीकडून चंदनखेडा बसस्थानक परिसरात पाम वृक्षाचे रोपण करण्यात आले. या वेळी भद्रावतीचे तहसीलदार महेश शितोळे, गटविकास अधिकारी डॉ. मंगेश आरेवार, चंदनखेडाचे सरपंच नयन बाबाराव जांभुळे, उपसरपंच भारती उरकांडे आदी उपस्थित होते.
040921\img-20210904-wa0000_1630730254910.jpg
कामाची पाहणी करताना रोहयो समितीचे अधिकारी