महापौरांनी केली नाल्यांची पाहणी

By admin | Published: May 13, 2017 12:36 AM2017-05-13T00:36:47+5:302017-05-13T00:36:47+5:30

चंद्रपूर शहर महानगरपालिकेतर्फे मोठे नाले जेसीबी व मनुष्य बळाद्वारे सफ ाई करण्याची मोहीम युध्द स्तरावर सुरू आहे.

Inspector of the canals by mayor | महापौरांनी केली नाल्यांची पाहणी

महापौरांनी केली नाल्यांची पाहणी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : चंद्रपूर शहर महानगरपालिकेतर्फे मोठे नाले जेसीबी व मनुष्य बळाद्वारे सफ ाई करण्याची मोहीम युध्द स्तरावर सुरू आहे. चंद्रपूर महानगरपालिकेच्या महापौर अंजली घोटेकर यांनी गुरुवारी नाले सफ ाईच्या कामाची पाहणी केली.
यावेळी त्यांच्यासोबत स्थायी समिती सभापती राहुल पावडे, नगसेविका संगिता खांडेकर, निलम आक्केवार, छबुताई वैरागडे, वंदना जांभुळकर तसेच प्रभारी मुख्य स्वच्छता निरिक्षक संतोष गर्गेलवार, मुख्य स्वच्छता निरीक्षक, प्रदीप मडावी विवेक पोतनुरवार, भूपेश गोठे, उदय मैलारपवार, महेंद्र हजारे उपस्थित होते.
शहरातील मुख्य नाले पावसाळ्यात तुंबून बॅक वॉटरचा फटका बसतो. त्यामुळे ते मान्सूनपूर्व साफ करण्यात येत आहे. बसस्टँड मागील नाला, इरानी मोहल्ला येथील मोठा नाला, मच्छी नाला, नेहरूनगर परिसरातील मोठा नाला,
भंगाराम मंदीर परिसरातील मोठा नाला, बजाज पॉलीटेक्नीक महाविद्यालय जवळील नाल्याची महापौरांनी प्रत्यक्ष जावून पाहणी केली.
तसेच कम्पोष्ट डेपो येथील कामाची पाहणी केली. शहरातील सर्व नाले ७ जुनपूर्वी पूर्वी सफ ाई करण्याचे स्वच्छता निरिक्षक यांना निर्देश दिले. सदर कामात कोणतीही हयगय होणार नाही, पूर्णपणे दक्षता घ्यावी, अशी अधिकाऱ्यांना महापौर अंजली घोटेकर यांनी सूचना केली.
दरम्यान, हे नाली सफाईचे काम अतिशय गांभीर्याने होत असून ४०० मजूर युध्दपातळीवर काम करीत आहे. तसेच शहरात नाले सफाईकरिता तीन अतिरिक्त जे.सी.बी., अतिरिक्त कर्मचारी, पोकलॅन्ड मशिन लावण्याबाबत आणि नाल्यावरील अतिक्रमण काढण्याबाबत अधिकाऱ्यांना निर्देश दिले.

Web Title: Inspector of the canals by mayor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.