स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जीवनातून राष्ट्रवादाची प्रेरणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2021 04:37 AM2021-02-27T04:37:04+5:302021-02-27T04:37:04+5:30
चंद्रपूर : स्वातंत्र्य लढ्यातील सहभाग आणि सशस्त्र क्रांतिकारकांना दिलेली प्रेरणा यामुळे स्वातंत्र्यवीर सावरकरांना क्रांतिकारकांचे मुकुटमणी म्हणून संबोधले जाते. देशासाठी ...
चंद्रपूर : स्वातंत्र्य लढ्यातील सहभाग आणि सशस्त्र क्रांतिकारकांना दिलेली प्रेरणा यामुळे स्वातंत्र्यवीर सावरकरांना क्रांतिकारकांचे मुकुटमणी म्हणून संबोधले जाते. देशासाठी त्यांनी केलेला त्याग आणि सोसलेला कारावास अभुतपूर्व आहे. त्यांच्या जीवनापासून प्रेरणा घेऊन आमच्यासारखे अनेक विविध क्षेत्रात कार्यरत आहेत. सावरकरांनी अर्धे अधिक आयुष्य देशासाठी तुरुंगात घालवले. अंदमान निकोबारमध्ये मरण यातना सोसल्या. त्यांच्यापासून राष्ट्रभक्तीची प्रेरणा घ्यावी, असे आवाहन माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केले.
भारतीय जनता पार्टी चंद्रपूर महानगरतर्फे स्वातंत्रवीर सावरकर पुण्यतिथीनिमित्त स्थानिक चंद्रपूर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर चौकात पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला चंद्रपूर महानगर जिल्हाध्यक्ष डाॅ. मंगेश गुलवाडे, महिला आघाडी अध्यक्ष अंजली घोटेकर, राजू वेलंकीवार, रत्नाकर जैन, सुहास आवळे, रवी येनारकर, संजय जोशी, महिला व बालकल्याण सभापती मनपा चंद्रकला सोयाम, माजी सभापती ब्रिजभुषण पाझारे, सुभाष कासनगोट्टुवार, विठ्ठल डुकरे, अनील फुलझेले, अरूण तिखे, संदीप आवारी, विनोद शेरकी, मोहन चैधरी, राजू घरोटे, नगरसेविका डुकरे, शिला चव्हाण आदी उपस्थित होते.