नागभीड सखी मंचतर्फे फॅशन शोला उत्स्फूर्त प्रतिसाद
By admin | Published: October 5, 2015 01:34 AM2015-10-05T01:34:25+5:302015-10-05T01:34:25+5:30
लोकमत सखी मंच नागभीडतर्पे २७ सप्टेंबरला पंचायत समिती सभागृहामध्ये फॅशन शो आणि विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
सखींचा सहभाग : विविध कार्यक्रमांचे आयोजन
नागभीड : लोकमत सखी मंच नागभीडतर्पे २७ सप्टेंबरला पंचायत समिती सभागृहामध्ये फॅशन शो आणि विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला परीक्षक म्हणून प्रीती विसेन, वर्षा नागपुरे, रेशमा शेख, अश्विनी बांबोळे आणि श्रीकांत कातरकर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरूवातीला तालुका संयोजिका रजनी घुटके यांनी गणराज श्री नाचतो नाचतो, हे गित सादर केले. ग्रामीण भागातील महिलांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा म्हणून सखी मंच नेहमीच तत्पर असतो. त्याचाच एक नविन उपक्रम म्हणून सखीसाठी फॅशन शो आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाला ग्रामीण भागातील सखींना उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या महिलांनी कॅटवॉक करून आपल्या प्रतिभेचे दर्शन दिले.
यामध्ये प्रथम विजेत्या हर्षा सेलोकर ठरल्या. द्वितीय पुरस्कार भावना बावनकर, तृतीय पुरस्कार वनिता शेंडे यांनी पटकाविला. त्यानंतर गायन स्पर्धेमध्ये सखींनी विविध प्रकारची भक्तिगीते सादर केली. यामध्ये प्रथम फुलन बांबोळे, द्वितीय भावना बावनकर, तृतीय क्रमांक निवेदिता सेंजर यांनी पटकाविला. त्यानंतर वक्तृत्व स्पर्धेमध्ये आजची स्त्री ही कशी असावी, या विषयावर सखींनी आपली मते मांडली. त्यामध्ये प्रथम याला देशमुख, द्वितीय हर्षा सेलोकर, तृतीय क्रमांक वनिता शेंडे यांनी पटकाविला. सर्व विजेत्यांना आकर्शक भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले.
यामध्ये चंदा शिंदे, रेखा देशमुख, छबू डोईजळ, अंजली भजे, कुंदा देशमुख, वंदना चिमूरकर, सारिका सहारे, वैशाली दोनाडे, अनिता लांबट, नंदा भेंडारकर, जान्हवी गुरव, भाग्यश्री वालदे या सहभागी झाल्या.
कार्यक्रमाचे संचालन प्रज्ञा बिगेवार यांनी केले. आभार तालुका सहसंयोजिका किरण गोडे यांनी मानले. कार्यक्रमाला ेसंवर्ग विकास अधिकारी प्रदीप बिरमवार, लता शेडमाके, प्रतिभा वंजारी, पदमाकर खोब्रागडे, प्यारेलाल बांबोळे, निखिल घुटके, प्रज्ञा बिगेवार, किरण गोडे, रजनी घुटके यांचे विशेष सहकार्य लाभले. (तालुका प्रतिनिधी)