घोडाझरी नहराचा तत्काळ उपसा करावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2017 11:12 PM2017-09-15T23:12:07+5:302017-09-15T23:12:28+5:30

नागभीड तालुक्यातील घोडाझरी तलाव शेतकºयांसाठी वरदान आहे. तालुक्यातील सर्वात मोठा तलाव म्हणून घोडाझरीची ओळख आहे.

Instant drainage should be done immediately | घोडाझरी नहराचा तत्काळ उपसा करावा

घोडाझरी नहराचा तत्काळ उपसा करावा

Next
ठळक मुद्देसिंचन विभागाचे दुर्लक्ष : ५८ गावांतील शेतकºयांमध्ये संतापाची लाट

लोकमत न्यूज नेटवर्क
तळोधी (बा) : नागभीड तालुक्यातील घोडाझरी तलाव शेतकºयांसाठी वरदान आहे. तालुक्यातील सर्वात मोठा तलाव म्हणून घोडाझरीची ओळख आहे. सुमारे सात हजार ५०० हेक्टर शेतजमीन घोडाझरी तलावाच्या पाण्याने सिंचित होते. ५८ गावातील शेतकरी या तलावावर अवलंबून आहेत. मात्र, नहर सोडण्याची वेळ जवळ येऊनही अजूनपर्यंत नहराची साफसफाई (उपसा) न झाल्याने शेतकºयांमध्ये संतापाची लाट पसरली आहे.
घोडाझरी तलावाचे दोन मुख्य कालवे आहेत. एक कालवा नवरगावकडे जातो तर एक कालवा तळोधी (बा.) कडे येतो. या दोन मुख्य कालव्याचे उपकालवे आहेत. नहर सोडण्यापूर्वी या कालव्याची साफसफाई होणे आवश्यक असते. उपसा करण्यासाठी सिंचन विभागाला शासनाकडून लाखो रुपयांचा निधी दिला जातो. मात्र, गेल्या काही वर्षांपासून कालव्याचा थातूरमातूर उपसा केला जातो व लाखो रुपयांचा निधी कंत्राटदाराच्या घशात जातो. घोडाझरी नहराची एवढी दुरवस्था झाली आहे की नहर सोडल्यावर काही दिवसातच कुठूनतरी नहर फुटतो व ऐन शेतकºयाला पाण्याची गरज असताना शेतकºयांना पाण्यापासून वंचित राहावे लागते. घोडाझरी नहराच्या उपसा नसल्याने शेवटच्या शेतकºयांचे धानपीक पाण्याअभावी करपले जाते. नहरामध्ये अनेक ठिकाणी मोठमोठी झाडे तयार झाली आहेत. त्या झाडांची मुळे खोलवर रुजल्याने नहराला भेगा पडून नहर कमजोर होत आहे. याकडे सिंचाई विभागाचे दुर्लक्ष होत आहे. नहरावर काही ठिकाणी अतिक्रमण केले गेले आहे. मात्र, हे अतिक्रमण सिंचाई विभागाकडून अजूनपर्यंत काढण्यात आले नाही.
यावर्षी सुरुवातीला पावसाने शेतकºयांना दगा दिला. अधून-मधून झालेल्या पावसाने रोवणी झाली. नवरगाव परिसरातील काही भागात तर आतापर्यंत रोवणी झाली. घोडाझरी तलावात अंदाजे १४ फुट पाणी आहे. काही दिवसात नहर सोडला जाणार आहे. मात्र, घोडाझरीचे पाणी शेतकºयांच्या शेतापर्यंत पोहचणार की नाही, याची शाश्वती वाटत नाही. नहराला काही ठिकाणी मोठे भगदाड पडले असून, नहर कमजोर झाला आहे. नहराच्या उपकालव्याचा लाखो रुपयांचा खर्च दाखविला जातो. मात्र, प्रत्यक्षात काम केले जात नाही. त्यामुळे शेतकºयांना पाण्यापासून वंचित राहावे लागते. नहर सोडण्याच्या काही दिवसांपूर्वी थातूरमातूर नहर साफ केला जातो. एकूणच घोडाझरी नहराकडे संबंधित विभागाचे कमालीचे दुर्लक्ष होत आहे. पाणी असूनही शेतकºयांना पाणी मिळणार की नाही, अशी भीती असून नहर साफ न केल्याने शेतकºयांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. संबंधित विभागाने नहराची लवकरात लवकर साफसफाई करावी, अशी मागणी केली जात आहे.

Web Title: Instant drainage should be done immediately

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.