नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना त्वरित आर्थिक मदत द्यावी

By admin | Published: October 21, 2016 01:06 AM2016-10-21T01:06:38+5:302016-10-21T01:06:38+5:30

परतीच्या पावसाने भद्रावती तसेच वरोरा तालुक्यातील शेतमालाचे नुकसान तसेच अनेक घरांची पडझड झाली

Instant financial assistance should be given to the affected farmers | नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना त्वरित आर्थिक मदत द्यावी

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना त्वरित आर्थिक मदत द्यावी

Next

काँग्रेसची मागणी : मुख्यमंत्र्यांकडे निवेदन
भद्रावती : परतीच्या पावसाने भद्रावती तसेच वरोरा तालुक्यातील शेतमालाचे नुकसान तसेच अनेक घरांची पडझड झाली. या नुकसानग्रस्त शेतकरी व नागरिकांना आर्थिक मदत त्वरित द्यावी, अशी मागणी तालुका काँग्रेसने केली आहे. तहसीलदार यांच्यामार्फत मुख्यमंत्री यांना निवेदनही पाठविले आहे.
हाती आलेले सोयाबिन, कापूस हे नगदी पिके परतीच्या पावसाने खराब होऊन शेतकऱ्यांना मोठे आर्थिक नुकसान झाले. गेल्या दोन वर्षापासून पडणाऱ्या दुष्काळाचा सामना करीत शेतकरी मेटाकुटीस आला आहे. त्यात यंदा चांगला पाऊस होऊन भरमसाठ पीक येणार, या आनंदात शेतकरी असताना परतीच्या पावसाने घात केला. तोंडाशी आलेले पीक खराब झाल्याने त्यांना आर्थिक फटका बसला. त्यातच अनेकांची मातीची घरे कोसळून नुकसान झाले आहे.
दिवाळीसारखा सण तोंडासमोर असताना हातात पैसा नाही. शासनाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तसेच पडझड झालेल्या मकानधारकांना त्वरित मदत करावी, याकरिता तहसीलदार सचिन कुमावत यांच्यामार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तालुका काँग्रेसतर्फे निवेदन पाठविण्यात आले आहे. यावेळी तालुका काँग्रेसचे अध्यक्ष अविनाश गोंडे, शहर काँग्रेस अध्यक्ष दिलीप ठेंगे, तालुका युवक काँग्रेस अध्यक्ष शंकर बोरघरे, वरोरा- भद्रावती विधानसभा युवक काँग्रेस महासचिव शाम चटपल्लीवार, रवी पवार, शहर युवक काँग्रेस अध्यक्ष सतिश वानखेडे, कार्यकर्ते मनोहर निब्रड, नंदकिशोर पचारे, राजू पाऊनकर, सागर नन्नावरे, सागर पोटे, सुरज रोडे, रुपेश मोहितकर, प्रविण देवगडे, आशिष लांडगे, जुबेर शेख, सलाम शेख, विवेक कामतवार, सागर अंबाघरे, दिनेश नागपूरे उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Instant financial assistance should be given to the affected farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.