जूनअखेरपर्यंत ५० टक्के कर्ज वाटप करण्याचे निर्देश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2021 04:19 AM2021-06-19T04:19:57+5:302021-06-19T04:19:57+5:30
जिल्हाधिकारी कार्यालयात कर्जवाटपाचा आढावा घेताना ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, अतिरिक्त जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर, निवासी उपजिल्हाधिकारी मनोहर ...
जिल्हाधिकारी कार्यालयात कर्जवाटपाचा आढावा घेताना ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, अतिरिक्त जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर, निवासी उपजिल्हाधिकारी मनोहर गव्हाड, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे, कृषी विकास अधिकारी शंकर किरवे यांच्यासह बँकांचे प्रतिनिधी उपस्थित होते. पालकमंत्री वडेट्टीवार म्हणाले, जिल्ह्यात जवळपास पावणेतीन लाख पात्र शेतकरी आहेत. खरिपामध्ये ८५० कोटींचे कर्ज वाटप करण्याचे जिल्ह्याला उद्दिष्ट आहे. सर्व बँका मिळून ६३७९८ शेतकऱ्यांना ५०३ कोटी २६ लाख रुपयांचे कर्जवाटप झाले आहे. ही आकडेवारी ५९.२१ आहे. त्यात चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने ५५०६५ शेतकऱ्यांना ४१८.७९ कोटी (९०.४५ टक्के), ग्रामीण बँकेने २७७७ शेतकऱ्यांना २९.२४ कोटी (३७.६१ टक्के), तर राष्ट्रीयीकृत बँकेने ५९५६ शेतकऱ्यांना ५५.२१ (१८ टक्के) कोटींचे कर्जवाटप केले आहे. सभासद शेतकऱ्यांची मागणी असेल तर बँकांनी त्वरित कर्जवाटप करावे, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.
बॉक्स
प्रस्तावित रस्त्यासंदर्भात आढावा
एडीबी बँकेतर्फे सिंदेवाही व सावली तालुक्यातील प्रस्तावित रस्त्यासंदर्भात पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी आढावा घेतला. त्यात सिंदेवाही ते पाथरी, हिरापूर ते बोथली या रस्त्याचा समावेश आहे. या रस्त्यामुळे तीन तालुके जोडले जाणार असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले. यावेळी घुग्घुस नगरपरिषदेच्या कामासंदर्भातही आढावा घेण्यात आला. यावेळी ब्रह्मपुरी वनविभागाचे उपवनसंरक्षक दीपेश मल्होत्रा, सिंदेवाहीचे उपविभागीय अधिकारी प्रकाश संकपाळ, नायब तहसीलदार सचिन पाटील, सा. बां. विभागाचे कार्यकारी अभियंता हेमंत कोठारी, उपवनअधिकारी सारिका जगताप आदी उपस्थित होते.