टॉवर लाईनचे काम बंद करण्याचे ऊर्जामंत्र्यांचे निर्देश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2018 11:09 PM2018-12-07T23:09:56+5:302018-12-07T23:10:44+5:30

चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या शेतात टॉवर उभारणी करताना योग्य मोबदला देण्यात येत नाही. शेतकऱ्यांना योग्य मोबदला देण्यात यावा, यावर चर्चा करण्याकरिता ऊर्जा मंत्रालय मुंबई येथे बुधवारी ऊर्जामंत्र्यांनी बैठक बोलाविली. यात टॉवर लाईनचे काम बंद करण्याचे निर्देश ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले.

Instructions for energizing the work of tower line | टॉवर लाईनचे काम बंद करण्याचे ऊर्जामंत्र्यांचे निर्देश

टॉवर लाईनचे काम बंद करण्याचे ऊर्जामंत्र्यांचे निर्देश

Next
ठळक मुद्देमंत्रालयात बैठक : बाळू धानोरकरांचा पुढाकार

लोकमत न्यूज नेटवर्क
वरोरा : चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या शेतात टॉवर उभारणी करताना योग्य मोबदला देण्यात येत नाही. शेतकऱ्यांना योग्य मोबदला देण्यात यावा, यावर चर्चा करण्याकरिता ऊर्जा मंत्रालय मुंबई येथे बुधवारी ऊर्जामंत्र्यांनी बैठक बोलाविली. यात टॉवर लाईनचे काम बंद करण्याचे निर्देश ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले.
वरोरा तालुक्यातीलगावाच्या परिसरात ट्रान्समिशनचे सबस्टेशनची उभारणी करण्यात येत आहे. या परिसरातून वरोरा- राजनांदगाव (रायपूर), वरोरा- करनूल, रायगड पुगलूर, वर्धा परळी ७६५,८०० केव्हीचे टॉवरची उभारणी केली जात आहे. टॉवरग्रस्त शेतकºयांच्या ३१ मे २०१७ रोजीच्या शासन निर्णयानुसार अकृषक वाणिज्य दराने मोबदला व पीक नुकसान देण्यात यावा, या मागणीकरिता आमदार बाळू धानोरकर यांनी शेतकºयांना सोबत घेवून अनेक आंदोलने केली. प्रत्येक वेळी टॉवर उभारणी करणाºया कंपनीने पोलिसांना हाताशी घेवून शेतकºयांना धाक दाखवून टॉवरचा व पीक नुकसानीचा योग्य मोबदला न देता टॉवरची उभारणी करणे सुरूच ठेवले. यामुळे शेतकºयांमध्ये प्रचंड असंतोष पसरत आहे. त्याच टॉवरग्रस्त शेतकºयांना योग्य मोबदला देण्यात यावा, याकरिता आमदार बाळू धानोरकर सातत्याने आग्रही असून त्याबाबत संबंधित विभागाशी पत्र व्यवहारही सुरु ठेवला. प्रसंगी आंदोलन व उपोषणाचा मार्गही पत्करला.
त्यानंतर राज्याचे ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावणकुळे यांनी बुधवारी मुंबई येथे टॉवरग्रस्त शेतकऱ्यांना योग्य मोबदला देण्याकरिता बैठकीचे आयोजन केले. बैठकीमध्ये आमदार बाळू धानोरकर, ऊर्जा प्रधान सचिव, महापारेषण व्यवस्थापकीय संचालक, पॉवरग्रीड कंपनीचे अधिकारी, चंद्रपूर जिल्हाधिकारी उपस्थित होते. यावेळी उर्जामंत्र्यांनी जिल्हाधिकारी यांना पुनर्मुल्यांकन करुन शेतकऱ्यांना योग्य मोबदला देण्याचे निर्देश दिले.
शासन निर्णयात तरतूद करणार
टॉवर पायाभरणी फुटींगचा मोबदला केंद्र शासन परिपत्रक २०१५ मधील ३.२ नुसार १०० टक्के देण्याबाबत, तसेच ७६५ केव्ही ट्रान्समिशन लाईनच्या वायर कॉरीडोरची मोजणी ही केंद्र शासन परिपत्रक २०१५ मधील १.३ नुसार ६७ मीटर व ८०० केव्हीसाठी ६९ मीटरचा मोबदला आणि तारेखालील जमिनीचा मोबदला १० टक्के देण्याबाबत या संबंधीची सुधारणा शासन निर्णयात करुन याबाबतचा अध्यादेश लवकरच काढण्याचे आश्वासन ऊर्जामंत्री ना.चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले.

मागील कित्येक वर्षापासून टॉवर उभारणी करताना शेतकऱ्यांवर प्रचंड अन्याय केल्या जात होता. आपण स्वत: शेतकऱ्यांना सोबत घेवून आंदोलन केले. मंत्रालयात झालेल्या बैठकीत सकारात्मक चर्चा झाल्याने शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळणार आहे.
- बाळू धानोरकर, आमदार वरोरा- भद्रावती विधानसभा

Web Title: Instructions for energizing the work of tower line

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.